Tarun Bharat

संकटकाळातही या कंपनीचा नफा दुप्पटीने वाढला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

कोविड 19 च्या संकटात अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईचा मार्ग अवलंबला आहे. यामध्ये संमेलन, बैठका, अभ्यास, मित्रांसोबत अन्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करताना झूम या प्लॅटफार्मचा वापर वाढला आहे. यातूनच झूम कंपनीचा नफा दुप्पटीने वाढला आहे. कंपनीचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतला लाभ हा वर्षाच्या आधारे दुप्पट झाला आहे. झूम ब्रँड आतापर्यंत कोणत्याही प्रसिद्ध कंपन्यांच्या यादीत नव्हता परंतु कोविडच्या संकटातील कामगिरीमुळे हा ब्रँड लोकप्रिय झाला आहे.

झूमचा नफा दुप्पटीने वधारुन 32.8 कोटी डॉलरच्या घरात पोहोचला आहे. आताच्या कामगिरीतील नफा हा 2.7 कोटी डॉलरने झाला आहे. एक वर्षाच्या अगोदरच्या तिमाहीमध्ये हा नफा 1,98,000 डॉलर होता. इतकेच नाही वॉल स्ट्रीटमधील कंपनीच्या समभागांचे भावही तीनपट वाढले आहेत.

 तिमाही अहवालाच्या सादरीकरणानंतर कंपनीचे समभाग मंगळवारी मजबूत स्थितीत राहिले होते. परंतु बुधवारी तेजी राखण्यात समभागांना अपयश आले होते. आमची कंपनी आता व्हीडीओ परिषद घेण्यासाठी मुख्य सेवा पुरविणारी कंपनी म्हणून आगामी काळात कार्यरत होणार असून त्यासाठी आम्ही आणखीन बदल करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍरिक युआन यांनी व्यक्त केला आहे. 

Related Stories

इलेक्ट्रिक विमानाची होतेय निर्मिती

Patil_p

कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर घटवले

Patil_p

व्होडाफोन,आयडियाची 3 जी सेवा लवकरच बंद

Patil_p

‘एमआरएफ’चा 70 हजारचा समभाग आता 100 मध्ये खरेदी करता येणार

Patil_p

शेअर बाजारात सप्ताहाचा शेवट तेजीने

Omkar B

सोन्याचे दर घसरले; 2 दिवसात 5 हजार रुपयांची घट

datta jadhav