Tarun Bharat

संकटात सॅमसंग इंडियाचा मदतीचा हात

केंद्र व राज्य सरकारांना 20 कोटींची मदत 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संपूर्ण देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या विरोधात सर्व सरकारी यंत्रणा आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे हातात हात घालून काम करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी समाजातील विविध दानशूर उद्योगपती, प्रमुख कंपन्या, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनीही मदतीचा हात कोरोनासाठी देत आहेत. सध्या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रसिद्ध ब्रँड सॅमसंग इंडियाने मदतीचा हात दिला आहे. पीएम केअर निधीत 20 कोटी रुपयांची सढळहस्ते मदत केली आहे. ही मदत केंद्र सरकार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारसाठी कंपनीने दिली आहे.

आर्थिक मदतीत कंपनीचे कर्मचारीही योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे तर मागील काही दिवसांपासून स्थानिक प्रशासन व पोलिसांना मदत करत आहे. गरजूना खाण्यापिण्याची व्यवस्थाही कंपनी करत आहे.

नुकसानीतही मदतीचा हात

लॉकडाऊमुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. परंतु याही कालावधीत टाटा उद्योगाने 1,500 कोटी तर विप्रोने 1,125 कोटीची मदत दिली आहे. कोटकचे उदय कोटक यांनी तरी आगामी एक वर्ष फक्त 1 रुपये वेतन घेणार असल्याची घोषणा केली आहे.

Related Stories

उद्योगांमुळे वीज मागणी वाढली

Patil_p

कल्पतरू पॉवरला मिळाले कंत्राट

Amit Kulkarni

एसबीआय कार्डचा समभाग घसरणीत

Patil_p

ऑनलाईन वॉलेटमुळे शॉपिंग करणे झाले सोपे

Patil_p

जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या निर्यातीत काही प्रमाणात सुधारणा

Patil_p

इमॅक्युअर फार्मास्युटिकलचा येणार आयपीओ

Amit Kulkarni