Tarun Bharat

संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रॅण्ड मास्टर

Advertisements

वृत्त संस्था/ ऍरेजेलोव्हेक (सर्बिया)

नागपूरचा 18 वर्षीय युवा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने येथे सुरू असलेल्या फिडेच्या स्वीस खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा आणि शेवटचा ग्रॅण्डमास्टर नॉर्म घेत ग्रॅण्डमाटर किताबावर शिक्कामोर्तब केला. संकल्प गुप्ता हा भारताचा 71 वा ग्रॅण्डमास्टर आहे.

ग्रॅण्डमास्टर किताब मिळविण्यासाठी तीन ग्रॅण्डमास्टर नॉर्मची आवश्यकता जरूरीची असते. संकल्प गुप्ताने 24 दिवसांच्या कालावधीत तीन विविध स्पर्धामध्ये आपला सहभाग दर्शवित ग्रॅण्डमास्टर किताब संपादन केला. सर्बियातील या स्पर्धेत  संकल्प गुप्ताने 2500 इलो मानांकन गुणांची मर्यादा पार केली. भारताचा ज्येष्ठ बुद्धिबळपटू आणि माजी विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदने तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने संकल्प गुप्ताचे खास अभिनंदन केले आहे.

Related Stories

जेनीफर ब्रॅडी पराभूत

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत सुरक्षेवर अधिक भर

Patil_p

सानिया-मॅकहेल उपांत्य फेरीत

Patil_p

शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

Patil_p

परुपल्ली कश्यपचे आव्हान समाप्त

Patil_p

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!