Tarun Bharat

संकेश्वर नगरपरिषद पोटनिवडणुकीचा आज निकाल

प्रतिनिधी/   संकेश्वर

संकेश्वर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 साठी अत्यंत चुरशीने पोटनिवडणूक पार पडली. रविवारी मतमोजणी होणार असून त्यामध्ये मुडशी की नेसरी यांच्या गळय़ात विजयाची माळ पडणार? याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्यादांच पोट निवडणुकीसाठी अटीतटीची लढत झाली. प्रभाग क्र. 13 हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या प्रभागाला वाचविण्यात काँग्रेसला यश येणार की भगदाड पडणार? याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. बी. पाटील यांनी मतदारांना आवाहन केले होते. माजी खासदार रमेश कत्ती यांनी प्रचाराचे नवनवे तंत्र वापरुन उमेदवाराला विजयी करण्याचा चंग बांधला होता. 

शुक्रवारी अक्कमहादेवी कन्या हायस्कूलच्या दोन केंद्रांवर 1468 पैकी 1124 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सदर प्रभागात शिंपी व मुस्लीम समाजाची मते निर्णायक आहेत. ती मते कोणाच्या पारडय़ात पडली आहेत, त्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

तहसीलदार कार्यालयात होणार मोजणी

हुक्केरी येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. संकेश्वर नगरपरिषदेसाठी 1 टेबल व सोलापूर, मावनूर व हत्तरगी या ग्रामपंचायतींसाठी 4 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेची मतमोजणी यंत्राद्वारे होणार असून ग्रामपंचायतीची मतमोजणी बॅलेटपेपरद्वारे होणार आहे. मोजणी प्रक्रियेसाठी 16 कर्मचाऱयांची नेमणूक केल्याची माहिती तहसीलदार डॉ. शिवानंद हुग्गार यांनी दिली.

Related Stories

येळ्ळूर गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

पारंपरिक पद्धतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

Omkar B

शेतकऱयांच्या शिवारात अन् डोळय़ातही पाणी…

Amit Kulkarni

श्रावणातील संकष्टीचे औचित्य साधून अथर्वशीर्षाची आवर्तने

Amit Kulkarni

खानापुरात शेतीच्या कामामुळे लॉकडाऊन नको

Patil_p

अग्नीपथ विरोधात खानापुरात भव्य मोर्चा

Tousif Mujawar