Tarun Bharat

संक्रांतीनिमित्त विठोबाच्या मंदिरात पाना फुलांची आकर्षक सजावट

Advertisements

पंढरपूर / प्रतिनिधी

मकरसंक्रांतीनिमित्त आज सावळ्या विठ्ठलाच्या व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहास पाना – फुलांची आकर्षक सजावट करण्यात आले आहे. तर रुक्मिणीमातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यामध्येही प्रामुख्याने रुक्मिणी मातेस मुकुट व गळ्यातील राणीहार हा तिळगुळासाठी खास तयार करण्यात आलेल्या हलव्यापासून तयार करण्यात आलेला आहे. संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरसह महाराष्ट्रातील हजारो महिलांनी रुक्मिणी मातेच्या साक्षीने सौभाग्यकांक्षिणीचे द्योतक असणारा वाणवसा यानिमित्ताने विठोबाच्या मंदिरात केला.

या सजावटीसाठी तब्बल पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असून यामध्ये मोगरा ,अस्टर ,जरबेरा ,झेंडू तुळस ,ब्लू डायमंड अशा विविध फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.

संक्रांतीच्यानिमित्ताने सर्वाधिक प्रमाणात महिला भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने आज करण्यात आली आहे तर पुरुष भाविकांना शक्यतो मुखदर्शन करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

चाणक्य मंडळाकडून ‘माणूस’ घडविण्याचे काम : बाबासाहेब पुरंदरे

prashant_c

सोलापूर : बेकायदेशीर गांजा विक्री प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

Abhijeet Shinde

बार्शीतील सासुरे येथे वाळू चोरी करणारे चौघे अटकेत

Abhijeet Shinde

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला सोलापूर राष्ट्रवादीकडून पाठिंबा

Abhijeet Shinde

नितीन राऊत, गजानन किर्तीकर, जितेंद्र आव्हाड यांना जाधवर युवा संसदेचे पुरस्कार

prashant_c

केरळनंतर पंजाब विधानसभेचा CAA विरुद्ध ठराव

prashant_c
error: Content is protected !!