Tarun Bharat

संक्रांतीसाठी बाजारपेठ बहरली

बाजारपेठेत विविध साहित्य, खाद्यपदार्थ, तिळगूळ, सुगड दाखल

प्रतिनिधी/ बेळगाव

अवघ्या चार दिवसांवर संक्रांतीचा सण येवून ठेपल्याने बाजारपेठेत संक्रांतीसाठी विविध साहित्य, खाद्यपदार्थ, तिळगूळ, सुगड दाखल झाले आहेत. बेळगावची बाजारपेठ ही मोठी वैशिष्टय़पूर्ण आहे. ताजी भाजी हे बेळगावच्या भाजीमंडईचे आकर्षण आहे. त्यातच संक्रांतीच्या दरम्यान विविध स्वरुपातील भाज्या आणि खास बेळगावलाच मिळणाऱया वाटाण्याच्या शेंगा यांची आवक वाढली आहे.

संक्रांतीनिमित्त शहर परिसरात ठिकठिकाणी तिळगुळाचे स्टॉल लागले असून 10 रुपये, 20 रुपये अशा दरात तिळगुळाची पाकिटे उपलब्ध आहेत. तिळगुळाचा दर 60 रुपये किलो असा आहे. संक्रांतीला प्रामुख्याने गुळपोळी, विविध प्रकारच्या पोळय़ा आणि मलिदा केला जातो. मात्र सणाच्या आदल्यादिवशी भोगीनिमित्त खास बेत असतो. या दिवशी प्रामुख्याने बाजरीची भाकरी केली जाते. ग्राहकांची सोय लक्षात घेत बाजारपेठेत आणि मॉलमध्येसुद्धा आता विविध प्रकारची पिठे उपलब्ध आहेत. नोकरदार महिलांनी बाजरीचे पीठ विकत घेणे पसंत केले आहे.

याशिवाय गृहोद्योग करणाऱया महिलांनी भाकऱया तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने लिंगायत समाजात लोकप्रिय असणारी ‘कटक रोट्टी’ म्हणजेच कडक भाकरी करण्यास 15 दिवसांपासूनच सुरुवात झाली आहे. या भाकऱया बरेच दिवस टिकतात, हे त्यांचे वैशिष्टय़ होय. 5 रुपयाला एक या दराने बाजरीची भाकरी तर सहा रुपयाला एक या दराने ज्वारी आणि नाचन्याची भाकरी मिळत आहे. मात्र त्याची पूर्व ऑर्डर द्यायला हवी. मक्मयाची रोटीसुद्धा बाजारपेठेत उपलब्ध आहे.

राजस्थानी समाजात संक्रांतीच्या निमित्ताने विविध प्रकारच्या मिठाई आणि गोड पदार्थ केले जातात. त्यासाठी सोहन हलवा, गजग, रेवडी, तिळपापडी, शेंगा गजग, शेंगापोळी, पुरणपोळी, करंजी यांचा समावेश आहे. सोनहलवा 650 रुपये sकिलो, रेवडी 200 रुपये किलो, तिळपापडी 130 आणि 150 रुपये, शेंगा गजग 150 रुपये असा दर आहे. राजस्थानी समाजात नव्याने लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला सुत्तरफेणी व घिवर देण्याचा प्रघात आहे. मात्र त्याची चव आवडल्याने अन्य समाजही त्याची खरेदी करून आस्वाद घेत आहेत. याचबरोबर गोटासुत्तरफेणी उपलब्ध आहे. हा पदार्थ म्हणजे शेवय्यांचाच लाडू असून तो दुधात घालून खावयाचा आहे.

संक्रांतीला सुगड पूजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील बाजारपेठेत सुगड विक्रीसाठी आले आहेत. प्रामुख्याने खानापूरहून बेळगावला त्याची आवक होते. येथील काही विपेते हा माल गोवा, कोकण परिसराला निर्यात करतात. बाजारात सध्या सुगडांचा दर दहा रुपयाला एक असा आहे. याशिवाय यंदा सुगडांना रंगरंगोटी करून विक्रीसाठी आणले आहे.

100 पासून 500 रुपयांपर्यंत तिळगुळाचे दागिने उपलब्ध

संक्रांत म्हणजे महिलांचा तिळगूळ समारंभ करण्याचा सण. या निमित्ताने वेगवेगळय़ा प्रकारचे वाण दिले जाते. त्यामुळे बाजारपेठेत असंख्य तऱहेच्या वाणवस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. महिलावर्ग हौसेपोटी आणि गृहोद्योग म्हणून तिळगुळाचे दागिने तयार करतो. बाजारपेठेत हे दागिनेसुद्धा विक्रीसाठी आले आहेत. नवविवाहिता, पाच वर्षांपर्यंतची बालके यांना संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे दागिने घालून सण केला जातो. दुकानात 100 पासून 500 रुपयांपर्यंत तिळगुळाचे दागिने विक्रीसाठी आले आहेत.

पुरेशा प्रमाणात कच्चामाल उपलब्ध नसल्याने दरवाढ

समीर शहापूरकर-

जवळजवळ 100 वर्षांपासून आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. यावषी सुगडाच्या दरात वाढ झाली आहे. उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. सुगड तयार करण्यासाठी कच्चामाल पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, हे दरवाढीचे कारण आहे. यंदा अद्याप खरेदीने वेग घेतला नाही. बहुदा उद्यापासून खरेदीला प्रारंभ होईल.

Related Stories

खबरदारी घेऊन यात्रा शांततेत पार पाडा

Amit Kulkarni

लिंगराज कॉलेजमध्ये हिजाबवरून वाद

Tousif Mujawar

थ्रीफेज विद्युतपुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर करा

Amit Kulkarni

फलक काढल्याने खानापूर नगरपंचायतीसमोर गोंधळ

Amit Kulkarni

व्यसनांपासून दूर राहिल्यास कॅन्सरही दूर

Amit Kulkarni

हिंडलगा लोकमान्य सोसायटीतर्फे वाहन तपासणी-नेत्रचिकित्सा शिबिर

Amit Kulkarni