Tarun Bharat

संगणक खरेदीची प्रधान सचिवांमार्फत चौकशी करा

Advertisements

स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठराव

प्रतिनिधी / कोल्हापूर

ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दीड कोटींच्या संगणक खरेदीचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत गाजला. गुरुवारी झालेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत या विषयावर वादळी चर्चा झाल्यानंतर `स्थायी’ च्या सभेतही सर्व सदस्य आक्रमक झाले. संगणक खरेदी प्रक्रियेसाठी जलव्यवस्थापन, स्थायी अथवा सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी घेतली नसताना सर्व सभागृहास अंधारात ठेवून तत्कालिन सीईओ अमन मित्तल यांनी खरेदी केलीच कशी ? असा सवाल समिती सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणाची शासनाच्या प्रधान सचिवांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर त्याबाबतचा ठराव करण्यात आला.

बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सतिश पाटील, सीईओ संजयसिंह चव्हाण, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, अरुण इंगवले, जयवंतराव शिंपी, युवराज पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागातील सादीलवारचा चार टक्के निधी त्याच विभागासाठी खर्च करणे अपेक्षीत आहे. पण मित्तल यांनी यामधील दीड कोटी रूपयांच्या निधीतून 168 संगणक व प्रिंटर खरेदी केले. विशेष बाब म्हणजे या खरेदी प्रक्रियेची पदाधिकाऱयांसह सर्व सदस्यांना कोणतीही माहिती न देता केली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी केवळ 5 संगणक हवे असताना एवढÎा मोठÎा प्रमाणात खरेदी केलीच कशी असा सवाल उपाध्यक्ष पाटील यांनी उपस्थित केला. अनेक तालुका पंचायत समित्यांमध्ये अधिकारी दोनच आहेत, पण तेथे चार संगणक दिले आहेत. संगणक देण्याबाबत तालुकास्तरावरून कोणतीही मागणी नसतानाही ते दिले आहेत.खरेदीची निविदा प्रक्रिया देखील शंकास्पद असून एकाच व्यक्तीच्या चार फर्मच्या नावे निविदा भरल्या आहेत. त्यामुळे या सर्व खरेदी प्रक्रियेची प्रधान सचिवांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सभेत करण्यात आली. या मागणीनुसार त्याबाबतचा सर्वानुमते ठराव करण्यात आला.

  प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार सर्वांग सुंदर

खासगी दवाखान्यांप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे स्वछ आणि सुंदर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वांग सुंदर दवाखाना हे अभियान राबविले जाणार आहे. आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी ही योजना प्राधान्याने राबविण्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना सभेमध्ये सूचना दिल्या. त्यासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून कर्मचाऱयांनी महिन्यातून एकदा श्रमदान करायचे आहे. या संकल्पनेतून खासगी दवाखान्यांप्रमाणेच सरकारी दवाखानेही स्वच्छ आणि सुंदर केले जाणार आहे. यामध्ये जिह्यात प्रथम येणाऱया प्राथमिक आरोग्य केंद्रास 1 लाख, दुसऱया क्रमांकाच्या प्रा.आ.केंद्रास 75 हजार तर तालुकास्तरावर प्रथम येणाऱया आरोग्य केंद्रास 50 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेत जिह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सभापती पाटील यांनी केले आहे.

Related Stories

भुदरगडात सहा जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी फिल्डींग

Abhijeet Khandekar

उद्धवजींना सल्ला देण्याची वेळ निघून गेली

Sumit Tambekar

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन

Abhijeet Shinde

राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी बोधचिन्ह तयार करण्याची स्पर्धा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बालिंगेत पतंगाच्या दोरीत अडकलेल्या ‘ब्राह्मण घारीची’ वाइल्ड लाईफकडून सुटका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!