Tarun Bharat

संगमेश्वरातील तिघांना डिस्चार्ज

Advertisements

वार्ताहर/ संगमेश्वर

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना मंगळवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. डॉर्क्ट्स, परिचारिका आणि उपचार करणाऱया सेवकांनी टाळय़ाच्या गजरात त्यांना निरोप दिला.

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील उपचार घेत असलेलया देवळे, भडकंबा व तुरळ येथील रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. या तिघांचे कोरोना अहवाल 14 व 15 मे रोजी पॉझीटीव्ह आले होते. हे तिघेही मुंबईतून आलेले होते. 10 दिवस निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  वैद्यकीय अधीक्षक अंबरीश आगाशे यांच्या देखरेखेखाली कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संगमेश्वर तालुक्यात आतापर्यत 28 रूग्ण सापडले असून त्यातील एकाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. याआधी 8 जणांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यात आता आणखी तिघांची भर पडल्याने आता 16 जण उपचाराखाली आहेत. मंगळवारी सांयकाळी टाळय़ांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन तिघांना निरोप देण्यात आला.

Related Stories

जि.प.अध्यक्षांच्या आरोग्य केंद्रांना भेटी

NIKHIL_N

नांदगाव- देवगड मार्गावरील कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात

Anuja Kudatarkar

प्रत्येक तालुक्यात प्रतिदिन 100 डोस

NIKHIL_N

अन्यथा महावितरण विरोधात व्यापक आंदोलन छेडणार!

NIKHIL_N

जिल्हा परिषदेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेपूर्वी शिवसेना सदस्यांचे निषेध आंदोलन

Anuja Kudatarkar

सागरी महामार्ग कामाला लवकरच मिळणार चालना

Patil_p
error: Content is protected !!