Tarun Bharat

संगमेश्वर खाडीपट्टयाला वादळी पावसाचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान

Advertisements

कोंडये गावाला सर्वाधिक फटका

वार्ताहर/ संगमेश्वर

   मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱयाने संगमेश्वर खाडीपट्टयातील अनेक घरांचे छप्पर उडाले असून वृक्ष उन्मळून घरांवर पडल्याने खाडीपट्टयातील घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोंडये गावातील घरांचे सर्वाधिक नुकसान झाले असून महसूल यंत्रणेव्दारे पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटांसह आलेल्या वादळी पावसाने संगमेश्वर तालुक्याला झोडपले. खाडीपट्टा भागातील कोंडये गावातील घरांचे, गुरांच्या वाडय़ांचे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले. गावातील सुरेश गंगाराम बोले, आत्माराम गंगाराम बोले, अशोक राजाराम बोले, चंद्रकांत शांताराम साळवी, संजय दत्ताराम सावंत, दीपक गणपत शिंदे, बाळकृष्ण सागवेकर, विष्णू देसाई यांच्या घरांवरील छप्परे उडाली. तर गोठय़ांचेही नुकसान झाले असून आंबा कलमे उन्मळून पडली आहेत. चंद्रकांत साळवी यांची 10 कलमे जमिनदोस्त झाली. त्यांच्याही घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर डावखोलमधील श्रीकृष्ण विठ्ठल रहाटे यांच्या घराचे आणि विठ्ठल महादेव रहाटे यांच्या गोठय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर खाडीभागातील विद्युत पोलही जमीनदोस्त झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

खाडीपट्टय़ातील घरांचे नुकसान झाल्याचे समजताच शिवसेना खाडीविभाग प्रमुख महेश देसाई, सागर देसाई, बंडय़ा शिंदे, तलाठी पी. एम. तांदळे, ग्रामसेवक विजापुरे, माजी सरपंच सुरेश दसम, सरपंच पुनम देसाई, संतोष देसाई यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्याचेही काम सुरु करण्यात आले.

माखजन येथे वीज पुरवठा खंडित

माखजन भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने काहीकाळ वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक भागात झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले. तर मोबाईल नेटवर्क सेवेचाही बोजवारा उडल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

Related Stories

मुंबईत परतीच्या एसटी प्रवासासाठी दररोज 34 गाडय़ा

NIKHIL_N

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भेडशी अध्यक्षपदी सिद्धेश उर्फ सनी केसरकर तर उपाध्यक्षपदी मिथुन बेळेकर

NIKHIL_N

Ratnagiri : गणपतीपुळे समुद्रात बुडताना एकाला वाचविले

Abhijeet Khandekar

संगमेश्वर पीर धामापूर येथे राहत्या घरातील कपाट फोडून लांबवली रोख रक्कम

Archana Banage

”व्यक्त व्हा… आठवणी जागवा” ; कोमसापचा अनोखा उपक्रम

Anuja Kudatarkar

शितपवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!