Tarun Bharat

संगमेश्वर तालुक्यात रविवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यात रविवारी मध्यरात्री 2 वाजून 36 मिनिटे आणि 20 सेकंदानी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या महिनाभरात भूकंपाचा हा दुसरा धक्का आहे.

गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यातील वातावरण ढगाळ आहे.रविवारी दुपारच्या दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस पडला होता. यातच रविवारी मध्यरात्री सुमारे चार रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. या अगोदर 24 ऑक्टोबर रोजी वाशी तर्फ संगमेश्वर येथील सुतारवाडी जमिनीपासून पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का बसला होता त्या वेळी आजूबाजूला कोयना,पाटण, पोफळी या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

रविवारी मध्यरात्री 2 वाजून 36 मिनिटे आणि 20 सेकंदाला 4 रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू संगमेश्वर जवळच्या तिवरे घेरा प्रचितगड च्या पूर्वेला कर्दे याठिकाणी असल्याचे सांगण्यात आले . झोन 4 मध्ये तालुक्याचा काही भाग येत असून यामध्ये चिपळूण, गुहागर,दापोली ,मंडणगड या तालुक्याचे समावेश होतो.या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

11 हजार 541 मेट्रीक टन आंब्याचा लिलाव

Patil_p

सरपंच संघटनेने हाय कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करावा!

NIKHIL_N

बांद्यात एकमूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम

NIKHIL_N

बदनामीच्या धमकीने मैथिलीचा काढला काटा

Patil_p

आयशर टेम्पो पलटी होऊन एक ठार

Patil_p

जिह्यात बाधितांच्या संख्येत घट

Patil_p
error: Content is protected !!