Tarun Bharat

संघटीत गुन्हेगारी मोडून काढणार : शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण

मंगेश चव्हाण यांनी स्विकारली कोल्हापूर शहर पोलीस उपअधिक्षकपदाची सुत्रे

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहर पोलीस उपअधिक्षकपदी मंगेश चव्हाण यांनी गुरुवारी पदभार स्विकारला. करवीर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी चव्हाण यांना पदभार दिला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांची यादी करुन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे नूतन पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. तसेच शहरातील सिसीटीव्हीसोबत पीए (पब्लीक अनाँसमेंट) सिस्टीम राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर पोलीस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांची बदली पिंपरी चिंचवड येथे झाली. त्यांच्या जागी बाबुराव महामुनी यांची नियुक्ती झाली. पण त्यांनी पदभार स्विकारण्यापूर्वीच त्यांची बदली इचलकरंजी येथे झाली. गेल्या दोन महिन्यांपासून करवीर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार होता. गुरुवारी मंगेश चव्हाण यांनी शहर पोलीस उपअधिक्षक पदाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुळचे सातारा येथील असणारे मंगेश चव्हाण 2013 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण केलेल्या चव्हाण यांनी नागपूर, लातूर शहर, अकलूज, मालेगांव या ठिकाणी पोलीस उपअधिक्षकपदावर काम केले आहे. याचा फायदा कोल्हापूर शहरामध्ये काम करताना होणार आहे. शहरामध्ये वाहतूकीच्या समस्या आहेत. या सोडवण्यावर आपला भर राहणार आहे. शहरामध्ये असणार्‍या सिसीटीव्ही सोबत पी.ए. यंत्रणा कार्यन्वीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. सिसीटीव्ही कक्षामध्ये बसून वाहतूकीच्या कोंडीच्या ठिकाणी सुचना देण्यात येणारी सेट्रलाईज साउंड सिस्टीम कार्यान्वीत करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी सराईत गुन्हेगारांच्या कारवायांना पायबंद घालण्यात येणार आहे.

शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण

Related Stories

कोल्हापूर : गांधीनगर पोलिसांकडून तिघा सराईत चोरट्यांना अटक

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 348 वर

Archana Banage

जीव मोलाचा नको निर्णय टोकाचा

Archana Banage

लसीचे दोन्ही डोस घेऊनही २३ हजार जणांना कोरोनाची बाधा, BMC चा अहवाल

Archana Banage

सातारचे एसपी अजयकुमार यांना केंद्र, राज्यांकडून पदक बहाल

Patil_p

प्रभाग रचना रद्द करा; चंद्रशेखर बावनकुळेंच निवडणूक आयोगाला पत्र

Abhijeet Khandekar