प्रतिनिधी / हुपरी
संचारबंदीचे उल्लंघन करून मानवी सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या हुपरीतील ओमणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील साखर कारखान्यास कोणतीही माहिती न देता कामगार घेऊन पळून जात असताना पोलिसांनी ओमनी चालक बजरंग धुराप्पा बोराटे (वय ३४) रा. कावणे, ता. करवीर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ओमनी गाडी (एमएच १० ईसी ०२९१) जप्त करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा फैलाव होऊन प्रकोप वाढत आहे. साथीचा रोग पसरत आहेत हे माहीत असताना बोराटे याने कारखान्यावरील कामगारांची जीवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणली. निष्काळजीपणे संचारबंदी नियमांचे उल्लंघन करून कामगारांची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात हुपरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल दीपक कांबळे यानी दिली आहे.


previous post