Tarun Bharat

संचारबंदीमुळे कारखान्यांना करावा लागणार शिफ्टच्या वेळेत बदल

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या संसर्गाला आळा बसण्यासाठी राज्य सरकारने रात्री 8 ते सकाळी 5 यावेळेत संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्यांमध्ये सुरू असणाऱया शिफ्टमध्ये बदल करावा लागणार आहे. संचारबंदीच्या वेळेनुसार नव्या शिफ्टची आखणी करण्यात आली आहे. यामुळे कामगारांच्या वेळेमध्ये पुन्हा बदल होणार आहे.

बेळगाव औद्योगिक क्षेत्रातील 30 टक्मके उद्योग हे 2 शिफ्टमध्ये सुरू आहेत. तर 70 टक्मके उद्योग हे एकाच शिफ्टमध्ये सुरू आहेत. ज्या उद्योगांमध्ये काम आहे अशांनी वेळेची विभागणी केली आहे. पुणे, मुंबई येथील कंपन्या बंद असल्यामुळे कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने अनेक कारखान्यांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात उत्पादन सुरू आहे. तर अनेकांनी कामगारांना सुटी दिली आहे. त्यातच संचारबंदीच्या नव्या नियमावलीमुळे शिफ्ट बदलावी लागणार आहे.

राज्य सरकारने सोमवारपासून रात्री 8 ते सकाळी 5 यावेळेत संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. बेळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्रामीण भागातून कामगार येतात. त्यांना याचा फटका बसणार आहे. दुसऱया व तिसऱया शिफ्टमध्ये काम करणाऱया कामगारांना रात्री 8 पूर्वी कारखाना गाठावा लागणार आहे.

रात्री 8 नंतर कोणत्याही व्यक्तीला संचार करण्याची परवानगी नसणार आहे. त्यामुळे कामगारांना त्यापूर्वी कारखान्यात पोहचावे लागणार आहे. तसेच ज्या कारखान्यामध्ये 3 शिफ्ट सुरू आहेत. त्यांना दुसऱया शिफ्टनंतर सकाळी 5 पर्यंत कारखान्यात थांबावे लागणार आहे. काही कारखान्यांनी संचारबंदीच्या वेळेनुसार आपल्या शिफ्टमध्ये बदल करून घेतला आहे.

Related Stories

चोर्ला महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

Amit Kulkarni

रोजगार हमी लाभार्थ्यांच्या मजुरीत वाढ

Amit Kulkarni

सरकारने आहार संदर्भातील योजना त्वरित राबवाव्यात

Omkar B

अग्निशमन जवानांनी प्राथमिक उपचार जाणून घ्यावेत

Patil_p

सर्पमित्रासाठी धावून गेले फेसबुक प्रेन्ड्स सर्कल

Amit Kulkarni

शहापूर येथे नवविवाहितेचा खून

Patil_p