Tarun Bharat

संजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरसीपी सिंह यांची वर्णी

Advertisements

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव मंजूर

पटना / वृत्तसंस्था

माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी यासंबंधीची घोषणा केली. बिहारची राजधानी पटना येथे रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आरसीपी सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अन्य सदस्यांनी मान्यता दिल्यामुळे जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरसीपी सिंह यांची एकमताने निवड करण्यात आली. चार वर्षांपूर्वी 2016 मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीश कुमार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद होते. आता ही जबाबदारी अधिकृतपणे सिंह यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारावेळी ‘आपली ही शेवटची निवडणूक असेल’ अशी घोषणा करत ‘याचा शेवटही गोड असेल’ असे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी ही निवड केल्याची चर्चा आता राजकीय पातळीवर सुरू झाली आहे. सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लावून त्यांना आपला राजकीय उत्तराधिकारीच बनवले आहे. सिंह हे पक्षात दुसऱया क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जातात. निवडणूक रणनीती निश्चित करणे, धोरण ठरवणे व त्यांची अंमलबजावणी करणे, यासारख्या कामांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. यामुळेच त्यांना जदयूच चाणक्मय देखील म्हटले जाते.

आरसीपी सिंह हे राज्यसभेत जदयूचे संसदीय पक्षनेते आहेत. ते नितीश यांचे निकटवर्तीय आहेत. बिहारच्या नालंदा जिल्हय़ातील मुस्तफापूरमध्ये 6 जुलै 1958 रोजी आरसीपी सिंह यांचा जन्म झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हुसैनपूर, नालंदा आणि पाटणा विज्ञान महाविद्यालयात झाले. त्यानंतर दिल्लीत जेएनयूमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. ते उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस झाले आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. त्यांनी रामपूर, बाराबंकी, हमीरपूर आणि फतेहपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Related Stories

“भाजपनं काश्मीर फाईल्सची तिकीटं वाटली तशीच पेट्रोलची कूपन्सही वाटावीत”

Abhijeet Shinde

‘बोडोलँड’प्रश्नी शांती करार

Patil_p

माझा-दोआबामध्ये ‘आप’ची एंट्री, काँग्रेस अडचणीत

Patil_p

काँग्रेस आमदारासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

Patil_p

गुजरातमध्ये लम्पी विषाणूमुळे बैल-गायींचा मृत्यू

Patil_p

नव्या संसद भवनात होणार हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni
error: Content is protected !!