Tarun Bharat

”संजयजी महिलांचा सन्मान होईल अशीच विधान करा, अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते”


मुंबई \ ऑनलाईन टीम

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायचं आहे की, भाषणात महिलांचा सन्मान होईल अशीच विधान करा. अन्यथा आम्हालाही सन्मान राखण्यासाठी ‘आरे’ला ‘कारे’ करण्याची भाषा वापरता येते हे लक्षात ठेवा, असा इशाराही चित्रा वाघ यांनी यावेळी दिला आहे.


संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला लगावतानाच असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Related Stories

बनावट एनओसीच्या आधारे बोजा उतरवून डंपरची विक्री

Patil_p

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातून बडतर्फ

Tousif Mujawar

अमेरिकेच्या व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची रिलायन्स ‘जिओ’मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

‘विचारांवर अधारीत संघटना असेल तर कार्यकर्ते झपाटून काम करतात’ : पालकमंत्री

Archana Banage

कॅलिफोर्नियाहून आलेल्या त्या रुग्णाचा पहाटे मृत्यू ; रात्री आला होता निगेटिव्ह रिपोर्ट

Archana Banage

जयस्तंभाबद्दल आक्षेपार्ह विधान भोवलं; करणी सेनाप्रमुखावर गुन्हा

datta jadhav