Tarun Bharat

संजय कोठारी दक्षता आयोगाचे आयुक्त

Advertisements

राष्ट्रपती कोविंद यांनी दिली शपथ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून निवृत्त सनदी अधिकारी संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिल्याचे राष्ट्रपती भवनातून दिलेल्या निवेदनामध्ये नमुद केले आहे.

कोठारी हे हरियाणा कॅडरचे 1978 च्या बॅचचे अधिकारी असून 2016 साली ते निवृत्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपतींचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यवर उपस्थित  होते. याआधीचे आयुक्त के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाल संपल्यानंतर गेल्या वर्षी जूनपासून हे पद रिक्त होते. कोठारी यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कमिटीने केली होती. तथापि काँग्रेसने याला विरोध दर्शवला होता.

Related Stories

हा भारताचा आत्मा आहे!

Patil_p

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

Patil_p

दिलासादायक : दिल्लीत एका दिवसात 4,465 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

यंदा मंत्र्यांनी नवी वाहने खरेदी करू नये : योगी आदित्यनाथ

datta jadhav

कर्जदारांना ऑगस्टपर्यंत सूट

Patil_p

म्युकरमायकोसिस आता साथीचा आजार

Amit Kulkarni
error: Content is protected !!