Tarun Bharat

संजय तेलनाडेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी / कोल्हापूर

कुख्यात गुंड संजय तेलनाडे याच्यावर खून, मारामारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असून फरार असणाऱ्या एसटी सरकार गँगचा म्होरक्या नगरसेवक तेलनाडेला पुण्यातुन जेरबंद केले. पोलिसांनी तेलनाडेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला शनिवारी रात्री कोल्हापुरात आणण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

इचलकरंजीसह परिसरात दहशतीचे साम्राज्य निर्माण केलेल्या आणि डबल मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मे २०१९ पासून पसार झाला होता. इचलकरंजी शहर व परिसरात दहशत माजविणाऱ्या या गँगविरुद्ध खंडणी भूखंड फसवणूक अत्याचार आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधूसह गँगविरुद्ध १८ मे २०१९ मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर तेलनाडे बंधूसह साथीदार पसार झाले होते. साथीदारांच्या वाढत्या कारनाम्यांनंतर गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई झाली होती.

Related Stories

डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने जयेश ओसवाल सन्मानित

Abhijeet Khandekar

प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान गेले कुठे ?

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 3 बळी, 14 कोरोनामुक्त

Archana Banage

दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईकासह दोघांना अटक

Archana Banage

Shivaji University : विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर विकास आघाडीचे वर्चस्व

Abhijeet Khandekar

गोकुळचा लवकरच उर्वरीत महाराष्ट्रात विस्तार

Archana Banage