Tarun Bharat

संजय धुमाळांवर विनयभंगाचा गुन्हा

पीडित शिक्षिकेची तक्रार – हजर झाल्यावर त्रास झाल्याने गटशिक्षणाधिकारी धुमाळ सिव्हिलमध्ये

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील एका महिला शिक्षिकेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱया सातारा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली, सातारा) यांच्यावर अखेर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याप्रकरणी धुमाळ वकिलांसह पोलीस ठाण्यात हजर झाले, मात्र तिथे त्यांना त्रास सुरु झाल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले असून सोमवारी त्यांची प्रकृती ठिक असेल तर अटक होईल, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी सांगितले.

  याबाबत पोलिसांनी देलेली माहिती अशी, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा पंचायत समितीत कार्यरत असलेले गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी दि. 5 ऑक्टोबर 2018 रोजी त्या पीडित महिलेला पंचायत समितीत बोलवून घेतले. त्यांच्या केबीनमध्ये तुमचे मिस्टर कुठे असतात ते काय करतात, तुमची बदली करु का, कोंढवलीला जाता का, चिंचणेर वंदनला येता का, का इतर कोणत्या शाळेवर जाता, अशा प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर शिक्षिकेने बदलीस नकार दिला. धुमाळ यांनी त्या पीडित महिला शिक्षिकेचे कामकाज खराब आहे असा अर्ज शाळा व्यवस्थापन समितीला पंचायत समिती कार्यालयाकडे करण्यास भाग पाडले.

   त्या चौकशीनिमित्ताने धुमाळ हे त्यांच्या शाळेला वरचेवर भेट देवू लागले. दि. 31 जानेवारी 2020 मुख्याध्यापकांना हालचाल रजिस्टर भरुन शाळेत माहिती भरण्यासाठी सातारा येथे गेल्या असता गटशिक्षणाधिकाऱयांनी दुपारी साडेचार वाजता शाळेस भेट दिली. त्या दिवशी ते शाळेचे कार्यालय व त्या शिकवत असलेला वर्ग सोडून रिकाम्या वर्गात जावून बसले. त्या शिक्षिका वर्गातून स्वागतासाठी गेल्या. नमस्काराने धुमाळांचे स्वागत केले. शाळेची व विद्यार्थ्यांची चौकशी न करता यंदा पाऊस जास्त झाला, उसाला खूप तुरे आलेत, असे खोचक शब्दप्रयोग त्या शिक्षिकेला वापरले. वर्गात येण्यास त्यांनी विनंती केली पण हे साहेब हट्टाने खुर्चीतून उठले नाहीत. एकटक त्या शिक्षिकेकडे पाहू लागले. त्या लाजून वर्गाकडे जावू लागल्या तेव्हा तेही मागे मागे जावू लागले. मुलांची थोडक्यात चौकशी केली. शाळा सुटल्यानंतर त्या शिक्षिका खोल्या बंद करत असताना धुमाळ यांनी चार चाकीतून घरी सोडण्याचा आग्रह धरला. शिक्षिकेने नकार देत दुचाकीने त्या घरी गेल्या. त्यानंतर वारंवार शाळेला धुमाळ भेट देवू लागले.

  दि. 8 मार्च 2020 रोजी धुमाळ त्यांच्या घरी गेले. महिला दिन असल्याने महिलांनी आजच्या दिवशी पुरुषांना सरप्राईज द्यायचे असते असे म्हणाले अन् बसून निघून गेले. त्यानंतर दि. 10 जुन 2020 रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या घरी गेले. त्या शिक्षिकेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन गेले. फोन करुन संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. दि. 17 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता न विचारता त्या शिक्षिकेच्या घरी गेले. आपण एकमेकांच्या जवळ येवू असे बोलून धुमाळ हे त्या शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी करु लागले. जबरदस्तीने मिठीत घेवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

Related Stories

मराठा समाज गोलमेज परिषदेला साताऱ्यात प्रारंभ

Archana Banage

कामगार मंत्री सुरेश खाडे यांची रोहिणी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट

Patil_p

पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली

datta jadhav

अन सातारच्या त्या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव ठेवले ’शंभूराज’

Patil_p

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

datta jadhav

जिह्यातील सहा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

Patil_p