Tarun Bharat

संजय राऊतांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा ; केली ‘या’ भेटीची मागणी


मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राजभवनावर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील खास शैलीत राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील, असे म्हणत त्यांनी जय महाराष्ट्र! म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , पर्यावरणमंत्री आदित्या ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्या ठरत आहे. तसेच त्यांच्या या हटके अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या भेटीचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

Related Stories

पुण्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा; 2 दिवसात 42 गुन्हे दाखल

datta jadhav

नीरज गुंडे फडणवीसांच्या काळातील सचिन वाझे

datta jadhav

2020 मध्ये देशात 13 हजारांहून अधिक रेल्वे अपघात

datta jadhav

सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही

datta jadhav

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात आतापर्यंत 15,294 पोलिसांना बाधा

Tousif Mujawar

पोलीस असल्याचे सांगून शेतकऱ्याचे नव्वद हजाराचे सोने लांबवले

Archana Banage