Tarun Bharat

संजय राऊत कुणी महान नेते नाहीत- चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी

संजय राउत यांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यावर राजकिय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या जप्तीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की संजय राऊत असे कुणी महान नेते नाहीत की ज्यांच्यावर कारवाई झाल्यावर भाजप सारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यावी.

पुढे बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “एक पैशाचाही भ्रष्टाचार नाही असं माध्यमांना सांगायचं नसतं ते कोर्टात सिद्ध करायचं असतं. भ्रष्टाचार केलाच नसेल तर घाबरता कशाला ? जनतेला सर्व कळत असतं”

संजय राऊतांनी या कारवाईवर दिलेल्या प्रतिक्रियेवर विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी संजय राउत यांच्या शब्दांवर एक पुस्तक तयार करायला लावणार आहे. संजय राउत नेहमीच अशा पद्धतीची भाषा वापरतात. त्यांच्या दाव्यांवर आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर जनता हसते. संजय राउत असे म्हणतात की कारवाईला आम्ही घाबरत नाही, आम्ही काय केलं असेल तर कारवाई करा. माझ्या मते लोकांचं ही म्हणणं हेच आहे की जो करेल तो भरेल, कर नाही त्याला डर कशाला?” असे ते म्हणाले.

मुश्रीफांवर कारवाई होउ शकते असे विचारले असता, “आणखी कोण कोण रांगेत आहे हे मला माहित नाही, चौकशी यंत्रणेला त्यांचं काम करू द्या. मुश्रीफांबाबत मला माहित नाही तुम्हाला माहीती हवी असेल तर किरीट सोमय्यांना फोन लावून देऊ का?” अशी प्रतिक्रीया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Related Stories

घरी आले म्हणून पाहुणचार केला, मी महाडिक समर्थक !

Archana Banage

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

datta jadhav

जानेवारीपासून लसीकरणाची तयारी ….

Patil_p

सांताक्रूझमधील LIC कार्यालयाला भीषण आग

datta jadhav

सातारा : घाडगे हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 24,752 नवीन कोरोना रुग्ण ; 453 मृत्यू

Tousif Mujawar