Tarun Bharat

संततधार पावसामुळे पेडणे तालुक्यात पडझड

Advertisements

प्रतिनिधी / मोरजी

संततधार पावसामुळे पेडणे तालुक्मयात ठिकठिकाणी झाडे तसेच वीज खांब उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यात शनिवारी रात्री हरमल येथील नोनू रिसॉर्ट जवळ मुख्य रस्त्यावरील वीज खांब कलंडल्याने वीज तारा लोंबकळत होत्याः मात्र वेळीच वीजपुरवठा खंडित झाल्याने पुढील अनर्थ टळला.

या मार्गावरील अवजड वाहतूक काही काळ बंद होती. येथील वीजपुरवठा तसेच रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली होती. वीज कर्मचाऱयांनी अथक परिश्रमातून खांब उभा करून रस्त्यावर कलांडलेल्या वीज तारा पूर्ववत केल्या त्यानंतर या मार्गावरील अवजड वाहतूक सुरळीत झाली तोपर्यंत दुचाकी तसेच लहान चारचाकी वाहने रस्त्याच्या वाट करून येजा करत होती. मात्र काही काळ याठिकाणी वाहतूक खंडित झाली होती.

  दरम्यान, मधलावडा पालये या ठिकाणी भलेमोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कलंडल्याने या ठिकाणी वाहतूक खंडित झाली होती. पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन ते झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Related Stories

आरोग्य मंत्र्यांनी खरे बोलणे, कोविड टेस्टींग व पारदर्शकता यांच्यावर भर द्यावा- राहुल म्हांब्रे

Patil_p

वळपे येथे औषधवाहू वाहन उलटले

Patil_p

‘सिली सोल्स’ प्रकरणी आज अबकारी आयुक्तांसमोर सुनावणी

Amit Kulkarni

गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालून सनबर्न नकोच

Patil_p

गोवा शिंपी समाजाचा स्नेह मेळावा उत्साहात

Amit Kulkarni

मयडेत साडेदहा लाखाचा ड्रग्ज जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!