वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया 75 व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ येथे काढण्यात आला. या ड्रॉनुसार बलाढय़ संघ पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाब यांचा एकाच गटामध्ये समावेश झाला आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ भारताचा माजी फुटबॉलपटू गौरमांगी सिंगच्या हस्ते काढण्यात आला. सदर स्पर्धा केरळमध्ये 20 फेबुवारीपासून खेळविली जाणार आहे. स्पर्धेच्या ड्रॉ नुसार अ गटात मेघालय, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ तर ब गटात गुजरात, कर्नाटक, ओडिशा, सेनादल आणि मणिपूर यांचा समावेश आहे.