Tarun Bharat

संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतून गोवा पात्रता फेरीत झाला गारद

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

पाच वेळा संतोष चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविलेल्या गोव्याला पात्रता फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. काल जामनगर येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या पश्चिम विभागातील पात्रता गटातील तिसऱया लीग सामन्यात गुजरातने गोव्याचा एकमेव गोलने पराभव केला आणि स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपविले. हा गोल 32व्या मिनिटाला प्रबलदीप खरे याने केला.

गोव्याला संतोष चषकाच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करण्यासाठी गुजरातविरूद्ध केवळ बरोबरीची आवश्यकता होती. या सामन्यापूर्वी गोव्याचे दोन सामन्यांतून 6 तर गुजरातचे 4 गुण होते. गोव्याने पहिल्या लीग सामन्यात दमण व दीवचा 2-0 तर दादरा नगर हवेलीचा 5-0 गोलानी पराभव केला होता. गुजरातचा दादरा नगर हवेली विरूद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला तर दमण दीव संघाला त्यानी 2-1 असे पराभूत केले होते. गुजरातचा गोव्यावरील विजयाने तीन सामन्यांतून 7 गुण तर गोव्याचे 6 गुण झाले. गटात अग्रस्थान मिळाल्याने गुजरात स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये गेला तर गोवा स्पर्धेबाहेर फेकला गेला.

Related Stories

गोवा-बेळगाव चोर्ला रस्त्याच्या बिकट अवस्थेबाबत वाळपई काँग्रेस आक्रमक

Omkar B

भर समुद्रातील प्रदुषणकारी कोळसा हाताळणी रोखा

Amit Kulkarni

लसीकरणाचे ’ड्राय रन’ यशस्वी

Patil_p

मडगावच्या दिंडी महोत्सवाला आजपासून प्रारंभ

Amit Kulkarni

वीज घोटाळाप्रकरणी खटला आता चालूच राहणार

Patil_p

काणका सर्कल जवळील रस्त्यावरील बेकायदेशीर गाळे काढण्याचा इशारा

Patil_p