प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हा बँक निवडणूक कालावधीत कणकवली येथील संतोष परब चाकू हलला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संशयित असलेले आमदार नितेश राणे हे शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालया कडे त्यांनी जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. यावर सरकार पक्षाला सोमवार पर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

