Tarun Bharat

संत गाडगे महाराज पुतळा सुशोभिकरण कामाला आज प्रारंभ; खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर परीट समाजाच्या मागणीनुसार अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱया संत गाडगे महाराज पुतळÎाच्या भोवतीच्या सुशोभिकरणाच्या कामाला शुक्रवार 22 जानेवारीला सकाळी 9ः30 वाजता सुरूवात होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. माजी महापौर हसिना फरास यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह माजी महापौर आर. के. पोवार, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, आदिल फरास, माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी उपमहपौर संजय मोहिते, परीक्षित पन्हाळकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक दत्ताबाळ सराफ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेविका सविता भालकर उपस्थित राहणार आहेत. ही माहिती  प्रकाश भालकर, संदीप भालकर, उदय भालकर यांच्यासह परीट समाजची कार्यकारिणी व महिला मंडळाच्या वतीने देण्यात आली. 

Related Stories

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, १४०० क्यूसेकने विसर्ग सुरू

Abhijeet Shinde

कोल्हापूरच्या जवानाच्या कुटुंबाला माजलगावकडून ४ लाख ५२ हजाराची मदत

Abhijeet Shinde

साहेब…, आम्ही शेतकरी आहोत!

Abhijeet Shinde

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

मोदी-शहा जोडी देश बरबाद करायला निघाली आहे : आमदार पीएन पाटील

Abhijeet Khandekar

हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या लढ्याला अखेर यश

Sumit Tambekar
error: Content is protected !!