अर्जून कपूर अन् परिणितीचा गूढ चित्रपट
संदीप और पिंकी फरार या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित आहे. अर्जून कपूर आणि परिणिती चोप्राची जोडी या ट्रेलरमध्ये अत्यंत प्रभावी दिसून येत आहे. हा चित्रपट 19 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेंस दिसून येतो. 1 मिनिट 46 सेकंदांच्या ‘संदीप और पिंकी फरार’ या ट्रेलरची सुरुवात पिंकी दहिया म्हणजेच अर्जून कपूर आणि संदीप कौर म्हणजेच परिणिती चोप्राच्या एंट्रीद्वारे होते. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर मागील वर्षी 4 मार्च 2020 रोजी सादर करण्यात आला होता. हा चित्रपट मागील वर्षी 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण महामारीमुळे याचे प्रदर्शन रोखण्यात आले होते. आता एक वर्षाने हा चित्रपट चालू महिन्यात प्रदर्शित करण्याची पूर्ण तयारी आहे.
Advertisements