Tarun Bharat

संदीप राजपुरे यांचा क्षेत्र प्रमुखपदाचा राजीनामा

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

शिवसेना पक्षातील स्थानिक नेत्यांकडून कुणबी समाजाला दुय्यम वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करून दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्यांनी याबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. यामुळे दापोलीत खळबळ उडाली असून त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे गुरुवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये संदीप राजपुरे हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा दापोलीत सुरू आहे. याबाबत यांना विचारले असता त्यांनी याला नकार दिला. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत व आजन्म बाळासाहेब यांचे शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची शक्यता धुडकावून लावली. मात्र त्यांनी दिलेल्या या पदाच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

Related Stories

तलाव ठेक्यामुळे मत्स्य विभागाला 7 लाखांचे परवाना शुल्क

Patil_p

ड़ॉ मोहित गर्ग यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार

Patil_p

पॅरोलवरुन फरार रफिक शेख 7 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

Patil_p

आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी

Abhijeet Shinde

सिव्हीलची ‘कायाकल्प’ची हॅटट्रीक!

Patil_p

स्पर्धा परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!