Tarun Bharat

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई?

मुंबई/प्रतिनिधी

पगारवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे अंदोलन सुरूच आहे. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. आजवर कधी ना झालेली ४१ टक्के पगारवाढ मान्य न करता कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. तर शासनाकडून कर्मचाऱ्यांवर करावीच बडगा उचलला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित तर काही कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढले आहेत. तरीही आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आता अशा कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या लावण्याची शक्यता आहे. आज याबाबतचा निर्णय होणार आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा” असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्या्ंच्या संपावर चर्चा सुरू असून आता राज्य सरकारकडून पगारवाढ आणि वेतनहमीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरीही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने राज्य सरकार कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

Related Stories

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापानच्या आधारे करणार उत्तीर्ण

Archana Banage

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

Archana Banage

पाडव्याच्या मुहुर्तावर खरेदीला झुंबड

Patil_p

भोसे येथील विपुल इंगवले यांना वीरमरण

Patil_p

मुंबईत जमावबंदीचे आदेश

Archana Banage

कोकणसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar