Tarun Bharat

संपकऱयांशी चर्चेचा प्रश्नच नाही; वेतनही नाही!

Advertisements

बेंगळूर : सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ आणि सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता देण्यासाठी परिवहन कर्मचाऱयांनी मागील सात दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, परिवहन कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत तर सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने समस्येवर तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी संपावर गेलेल्या परिवहन कर्मचाऱयांविषयी असमाधान व्यक्त केले असून चर्चेचा प्रश्नच नाही आणि संपकऱयांना वेतनही देणार नसल्याचे परखडपणे सांगितले आहे. बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले., परिवहन कर्मचाऱयांनी महिनाभर संप केला तरी त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देणे शक्य नाही. संपकऱयांशी चर्चेचा प्रश्नच नाही. त्यांना वेतन देणेही शक्य नाही. कामावर हजर झालेल्यांनाच वेतन देण्यात येत आहे. परिवहनला पर्यायी व्यवस्था केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन कर्मचारी कुणाचे तरी ऐकूण सणाच्या कालावधीत संपावर गेले आहेत. त्यामुळे कोणालाही बोलावून चर्चा करणार नाही. कर्मचाऱयांनी अनुसरलेली भूमिका योग्य नाही. संपामुळे परिवहन खात्याबरोबरच कर्मचाऱयांचीही नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

कर्नाटक सीईटी पुढे ढकलली

Abhijeet Shinde

अकरावीसाठी ऑनलाईन परीक्षा

Patil_p

केएसआरटीसीची कार्गो सेवा सुरू

Amit Kulkarni

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण

Abhijeet Shinde

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Shinde
error: Content is protected !!