Tarun Bharat

संपर्क टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रोबो

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाविरुद्ध लढाई लढणाया आरोग्य कर्मचाऱयांना साथ देण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात रोबो दाखल झाला आहे.  त्यामुळे औषधे व विविध वस्तू देण्यासाठी आरोग्य कर्मचायांचा कोरोनाबाधित रुग्णांशी येणारा संपर्क कमी होण्यास मदत होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीने हा रोबो बनवून दिला आहे. या रोबोमुळे रुग्णाला दिवसातून दिली जाणारी औषधे, जेवण किंवा अन्य वस्तू लांबून देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱयांचा रुग्णाशी येणारा संपर्क कमी होणार आहे. परिणामी त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोकाही कमी होणार आहे.  

  संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाशी गेले 50 दिवस जिह्यातील आरोग्य कर्मचारी दोन हात करत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांबरोबर जिह्यातही कोरोना रुग्णांची तपासणी व उपचार व अन्य कामात असलेल्या आरोग्य कर्मचारीच या आजाराच्या संसर्गात अडकल्याचे समोर आले आहे. तरीही जिह्यातील आरोग्य कर्मचारी आताही या आजाराची बाधा झालेल्यांना बरे करण्यासाठी झटत आहेत.

  यामध्ये केवळ वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर, परिचारिका, या वॉर्डमधील सफाई कर्मचारी, मदतनीस, जेवण देणारे या सर्वांचाच समावेश आहे. वैद्यकी अधिकायांपेक्षा जास्त काळ इतर जणांना या रुग्णांच्या जवळपास जावे लागते. त्या सर्वांनाच पीपीई किटची उपलब्धता होत नाही. त्यातच रुग्णाच्या संपर्कात येणाऱयाला याची बाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी हायरिस्कमध्ये आहेत. 

    या कर्मचायांचा कोरोनाबाधित रुग्णाशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी राज्यामध्ये काही ठिकाणी यापूर्वीच रोबोचा वापर केला जात होता. त्याची होणारी मदत पाहता साताऱयातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातही अशा प्रकारचा रोबो असावा यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाठपुरावा केला. त्यातून टाटा टेक्नॉलॉजीने हा रोबो बनवून दिला आहे. हा रोबो जिल्हा रूग्णालाणत दाखल झाला आहे. हा रोबो जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये काम करणार आहे.

Related Stories

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे सर्व ट्विट डीलिट

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 184 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

अंजिक्य गणेश मंदिरासमोरील हातगाडे हलवा

Omkar B

खानापूर तालुक्यातील 65 गावांचा सर्व्हे पूर्ण

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान बरखास्तीच्या हालचाली

Archana Banage

साताऱ्यात मुक्तीदर ७८.१२ टक्क्यांवर

Archana Banage