Tarun Bharat

संपामुळे पोस्ट कार्यालयात नागरिकांच्या रांगा

प्रतिनिधी /बेळगाव

खासगीकरणासह इतर मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारला होता. यामुळे सोमवार व मंगळवारी पोस्ट कार्यालये बंद होती. सेवा बंद असल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले. बुधवारी सकाळपासून पोस्ट कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती.

 मार्चअखेर असल्यामुळे रजिस्टर पोस्ट पाठविणाऱयांची गर्दी अधिक असते. परंतु पोस्ट कार्यालयाच्या नियोजन अभावामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. खासगी कुरिअरपेक्षा चांगल्या सेवा देणार, असे सांगण्यात येत असले तरी कर्मचारी कमी असल्याने ते शक्मय होत नसल्याचे दिसत आहे.

पोस्ट, पीएलआयसाठी एकच काऊंटर

दोन दिवस पोस्ट कार्यालय बंद असल्याने बुधवारी मुख्य पोस्ट कार्यालयासह इतर कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. गर्दी होणार हे माहिती असतानाही एकच काऊंटर सुरू ठेवण्यात आले होते. स्पीड, रजिस्टर पोस्टसह पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पार्सल, मनिऑर्डर यासह सर्व सेवांसाठी दुसऱया मजल्यावरील कार्यालयात एकच काऊंटर देण्यात आले. यामुळे नागरिकांना एका कामासाठी तासभर रांगेत उभे रहावे लागले. निदान गर्दीच्यावेळी तरी दोन काऊंटर सुरू करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात होती. 

Related Stories

बसस्थानक रस्त्यावरील दुभाजक हटविला

Amit Kulkarni

शिवजयंती सोहळा तब्बल 11 तास

Omkar B

प्लास्टिक बंदीअंतर्गत नागरिकांवरही दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

अरबाजचा खून करणाऱयांना कडक शिक्षा करा

Amit Kulkarni

खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

Patil_p

पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

Patil_p