Tarun Bharat

संप काळात तिसऱयांदा चिपळूण-रत्नागिरी फेरी रवाना

Advertisements

चालक कम वाहक सुशांत आंब्रेंचे धाडस

चिपळूण

खएसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप कायम असताना अशातच 8 दिवसांनंतर पुन्हा शनिवारी व रविवारी असे दोन दिवस चिपळूण-रत्नागिरी फेऱया सकाळी 10.30 वा. रवाना झाल्या. संपकाळात प्रवाशांना वाहतुकीचे साधन नसल्याने या फेरीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

हा संप अद्यापही सुरु असल्याने आगारातील सर्वच फेऱया रद्द झाल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली एसटी बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. इतकेच नव्हे तर एसटी बंदमुळे बसस्थानकासह परिसरातील व्यावसायिकांचा व्यवसाय चालणेही कठीण होऊन बसले आहे. एसटी बससेवा सुरु होईल, या अपेक्षेने काही प्रवासी आजही बसस्थानकात येत आहेत. संपकाळात प्रवाशांची गैरसोय होत असताना अशाही स्थितीत त्यांना  दिलासा मिळावा, यासाठी चिपळूण आगारातील चालक कम वाहक सुशांत आंब्रे यांनी पुन्हा 8 दिवसांनंतर धाडस करत पुन्हा शनिवारपासून सकाळी 10.30 वा. चिपळूण-रत्नागिरी बसफेरी नेली. शनिवारी या फेरीला चांगला प्रतिसाद लाभला असून शनिवारी जातेवेळी 48 तर येतेवेळी 79 प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. याबरोबरच रविवारीही जातेवळी 35 प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. दरम्यान, प्रवासादरम्यान खोळंबा झालेल्या प्रवाशांना एसटी रस्त्यावर दिसताच त्यांच्या चेहऱयावर समाधान पसरले. प्रत्येक थांब्यावर या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून आंब्रे यांनी या फेरीदरम्यान चालकासह वाहकाचीही भूमिका जबाबदारी सांभाळली. त्यांच्या धाडसाविषयी सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

चिखलगावची रणरागिणी मेजर मैत्रेयी दांडेकर…!

Omkar B

गिम्हवणेतील भैरी मंदिराची दानपेटी चोरटय़ांनी फोडली!

Patil_p

आजगावात एसटी बसचा अपघात

Anuja Kudatarkar

शंभर रुपयाच्या किटच्या प्रतीक्षेत रेशन कार्डधारक

Anuja Kudatarkar

रक्तदाता हरपला; सनी रेडकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

कणकवली तालुक्यात शाळेची घंटा अर्धीच वाजली

NIKHIL_N
error: Content is protected !!