Tarun Bharat

संबरगी ग्राम पंचायतीत गैरव्यवहार

प्रतिनिधी/ बेळगाव

संबरगी (ता. अथणी) ग्राम पंचायतीत अनुदानाचा नियमबाहय़ वापर झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.

नागनूर पी. ए. येथील कुमार श्रीशैल कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे एक निवेदन दिले आहे. या निवेदनाबरोबरच आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची कागदपत्रे जोडण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्राम पंचायत अध्यक्ष व पीडीओ यांच्या विरोधात आरोप करण्यात आला आहे. पथदीपांची वीजबिले भरण्यासाठी ग्राम पंचायतीच्या खात्यात सरकारकडून जमा झालेले 10 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या निधीचा वापर कोणत्याही विकासकामासाठी झाला नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून निधीचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Related Stories

जांबोटी-चोर्ला मार्गावरील कुसमळी पूल धोकादायक

Amit Kulkarni

जादा दराने विक्री करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई

Amit Kulkarni

विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान द्या

Patil_p

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं.साठी पहिल्या टप्प्यात मतदान

Patil_p

वृद्धांची पेन्शन बंद अन् तरुणांना सुरू!

Patil_p

पालकमंत्र्यांनी घेतला पुरा संदर्भात आढावा

Rohit Salunke