Tarun Bharat

‘संभाजीराजे पटवता न येणारा माणूस’

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : संघर्ष आणि चर्चा कधी करायाची ज्याला समजले तोच खरा नेता

प्रतिनिधी/कोल्हापूर

खासदार संभाजीराजेंना आम्ही पटवले आहे, असे काहीजण म्हणतात. मात्र संभाजीराजे पटवता न येणारा माणूस आहे. जे योग्य आहे तेच बोलणारे आणि करणारे हे नेतृत्व आहे. निरपेक्ष भावनेने ते मराठा समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी लढत आहेत. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व समाजाने मान्य केले आहे. कोरोनाच्या संकट काळात मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी संयमाने केलेले आंदोलन कौतुकास्पद आहे. मात्र काहीजण सध्याच्या भयंकर परिस्थितीतही आदळाआपट करायची भाषा करत आहेत. संघर्ष कधी करायचा आणि चर्चा कधी करायची हे   ज्याला समजते तोच खरा नेता. आदळाआपट करायला लावणे ही नेतृत्वाची लक्षणे नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील यांचे कौतुक केले. तर भाजप नेत्यांचा अप्रत्यक्ष समाचार  घेतला.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह संपूर्ण जगावर गेल्या दिड वर्षांपासून घोंघावत आहे. अशा भयंकर परिस्थितीत एखाद्या समाजाला न्याय हक्कासाठी रस्त्यावर संघर्ष करायला लावायचा. त्यांना मोठया संख्येने एकत्र बोलावून त्यांच्या माध्यमातून कोरोना घरोघरी पोहचवायचा, हे नेतृत्वाचे लक्षण नाही. समाजाचे चोहोबाजूंनी रक्षणा करणारा, त्यांच्या आरोग्याचा विचार करणाऱयालाच खरा नेता म्हणाता येईल, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

सरकार एैकत असेल तर आदळाआपट कशासाठी

 मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सारथीचे उपकेंद्र सुरु करुन मागण्यांची पुर्तता करण्याचे एक पाऊल सरकारने टाकले आहे. सरकार जर एwकत असेल तर मग आदळाआपट कशासाठी असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकार जर एैकत नसेल तर आपण स्वतःच मराठा समाजासोबत संघर्षासाठी उतरलो असतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच सराकार एwकत असूनही जर काहीजण आदळाआपट करत असतील तर त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही, असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.

न्यायालयीन लढाई सोडून दिलेली नाही

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी फेरविचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन लढाई सोडून दिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून आरक्षणाचा अधिकारी राष्ट्रपती, केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आपल्या अधिकारात आरक्षणाचा निर्णय घेवून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे केल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

सतेज पाटील यांचेही केले कौतुक

सतेज पाटील यांच्या नावात तेज तर कार्यात गती आहे. त्यांनी संभाजीराजे, मराठा समाज आणि महाविकास आघाडीचे सरकार यांच्यामध्ये समन्वयकाची उत्तम भुमिका बाजवली आहे. सरकार आणि संभाजीराजे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दहा दिवसातच त्यांनी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरु करण्यासाठी गतीने हालचाली केल्या. जागा, इमारत निश्चित होताच अवघ्या 18 तासात युद्धपातळीवर त्यांनी इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी करुन उद्घाटनासाटी इमारत सुसज्ज केली. याकाळात सतेज पाटील यांनी बजावलेली समन्वयाची भुमिका कौतुकास्पद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे कौतुक केले.

Related Stories

ऊसतोड मजुरांचे लसीकरण करा : अमल महाडिक

Abhijeet Khandekar

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर शाहुवाडी पोलीसात गुन्हा नोंद

Archana Banage

सातारा तालुक्यातील ७४ जणांना पुरवठा विभागाच्या नोटीसा

Archana Banage

वडगाव बाजार समिती मतमोजणी; राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

Archana Banage

मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम येणार कोल्हापूरात

Archana Banage

चंदीगड वसतीगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल, विद्यार्थिनी आक्रमक

Archana Banage