Tarun Bharat

संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथे ड्रेनेज पाईप फुटल्याने दुर्गंधी

बेळगाव / प्रतिनिधी

येथील संभाजी गल्ली महाद्वार रोड येथे डेनेज ब्लॉकेज असल्याने पाईप घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. मात्र सदर ब्लॉकेज काढतेवेळी पाईप अडकल्याने पाईप काढण्यासाठी दुसऱया ठिकाणी खोदाई करताना डेनेजची  मुख्य वाहिनी फुटल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रहिवाशांना या ठिकाणी राहणे मुश्कील झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

   पावसाचे पाणी या खड्डय़ात साचले असून या मार्गावरून जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. सदर डेनेज वाहिनी फुटून पाच ते सहा दिवस उलटून गेले तरी दुरुस्ती निवारणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

  वाहनधारकांना दुसऱया बाजूला जाण्यासाठी आपली दुचाकी अलीकडे पार्क करून जावे लागत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर येथील खोदण्यात आलेला खड्डा बुजवून डेनेजची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बसव कॉलनीत खुनामुळे खळबळ

Tousif Mujawar

केंद्रीय माहिती आयुक्त डॉ. माहुरकर यांची ‘लोकमान्य’ला भेट

Amit Kulkarni

कोरोना: कर्नाटकातील १३ जिल्ह्यांमध्ये सोमवारी ७३ रूग्णांचा मृत्यू

Archana Banage

आयएमईआरमध्ये अपॉर्च्युनिटीज ईन एचआर विषयावर कार्यशाळा

Amit Kulkarni

नाझर कॅम्प परिसरात सीडीवर्कचे काम अर्धवटच

Amit Kulkarni

जिल्हा प्रशासनातर्फे सेवालाल जयंती साधेपणाने

Amit Kulkarni