Tarun Bharat

संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा साजरा

वार्ताहर/ परळी

किल्ले सज्जनगडावर श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सज्जनगडावरील श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर येथे साजरा करण्यात आला.

श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी समर्थ वंशज सूर्याजी (गवालक्ष) स्वामी उपस्थित होते तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या क्षेत्र गंगावली ते राजधानी सातारा दिनांक 18 ते 19 मे 2022 रोजी होणाया पालखी सोहळ्याचे पोस्टरचे अनावरण ही याप्रसंगी करण्यात आले.

सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामींच्या मंदिराचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली पूर्ण झाले होते. अशा समर्थ राम मंदिरातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. असे उद्गार रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी यांनी काढले. यावेळी परळी पंचक्रोशीतील दुर्गप्रेमी शिवप्रेमी उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सज्जनगड दुमदुमून निघाला होता.

Related Stories

सातारा : डिजीटल ग्रामपंचायत आणि हायमॉस्ट लॅम्पचे उद्घाटन

Archana Banage

सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि पी.एन.पाटील यांना एकटे पाडण्याची तयारी, जिल्ह्यात नवी राजकीय व्यूहरचनेची तयारी

Rahul Gadkar

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी

Patil_p

गांधीनगरमधील व्यापाऱ्याला कोरोना लागण

Archana Banage

शिवसेना कमकुवत झाल्याने भाजपाला पक्षवाढीसाठी मोठी संधी

datta jadhav

सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

Archana Banage