Tarun Bharat

संभाव्य महापुरासाठी कुरूंदवाड पालिका प्रशासन सज्ज

मुख्याधिकारी निखील जाधव यांची आढावा बैठकीत माहिती

प्रतिनिधी /कुरुंदवाड

संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता कुरुंदवाड शहरात जनजागृतीसह ठोस उपाययोजना राबवण्यासाठी पालिका प्रशासनाने आढावा बैठक घेऊन महापुराचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्याधिकारी निखील जाधव यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव सुरू असल्याने महापुराच्या काळातही पालिका कर्मचाऱयांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत सेवा बजावावी, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.

येथील पालिका सभागृहात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि कर्मचाऱयांच्या बैठकीत बोलत होते.

मुख्याधिकारी जाधव म्हणाले, 2019 च्या महापुरात ज्या उपाययोजना होत्या, त्या परत राबविणे, अन्य उपाययोजना अंमलात आणण्यासंदर्भात संबंधित विभागीय अभियंत्यांना सूचना केल्या. महापुराच्या काळात स्थलांतरासाठी शाळा, कॉलेज, महाविद्यालये, मंदिरे या ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवाऱयाची सोय करण्यासाठी संबंधितांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

एस. पी. हायस्कूलच्या मैदानावर हेलिपॅड तयार करणे, शहरातील जुन्या इमारती वेडीवाकडी आलेली झाडेझुडपे कटिंग करण्यासाठी संबंधितांना सूचना देणे, महापुराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मिळणाऱया सूचनेप्रमाणे शहरातील संबंधित भाग स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

आपत्कालीन विभाग निर्माण करून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना तात्काळ संपर्क साधता यावा, या दृष्टिकोनातून इंधनाचा साठा, वीजेसाठी जनरेटरची सोय करण्यात येणार आहे. महापुराच्या काळात पालिका कर्मचारी व अधिकाऱयांना देण्यात येणाऱया रजा रद्द करण्यात येणार आहेत. महापुराचे पाणी शहरात शिरल्यानंतर ड्रोनद्वारे  चित्रीकरण करण्यात येणार आहे.

महापुराचे पाणी येणार असल्याचा अंदाज वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाल्यास शहरातील विविध भागातील, प्रभागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला मदत करावी आणि स्वतःचे स्थलांतर करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी जाधव यांनी केले आहे.

यावेळी पालिका कार्यालय निरीक्षक पूजा पाटील, पाणी पुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, बांधकाम अभियंता योगेश गुरव, कर निरीक्षक, प्राची पाटील, संगणक अभियंता प्रणाम शिंदे, लेखापाल महादेव आंबी, कर लिपिक नंदकुमार चौधरी, अमोल कांबळे, अजित दीपंकर, निशिकांत ढाले, राजेंद्र गोरे, आनंद शिंदे, अविनाश गोरे, अभिजीत कांबळे, दिनेश हातळगे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोना, आज बाधितांचा आकडा 188च्या पुढे

Archana Banage

Bharat Jodo Yatra : शरद पवार करणार महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रे’चे स्वागत

Abhijeet Khandekar

स्व.आप्पासाहेब सारे पाटील समाजभूषण पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर  यांना जाहीर 

Archana Banage

गांधीनगर मुख्य रस्यावरील बेकायदेशीर बांधकामावरील कारवाई टळली

Archana Banage

राजू शेट्टींना उपचारासाठी पुण्यात केले दाखल

Archana Banage

महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar