Tarun Bharat

संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे निधन

प्रतिनिधी / शिरोडा:

शिरोडा गावचे सुपुत्र तथा प्रख्यात संमोहन तज्ञ (हिप्नॉटिझम) प्रा. मनोहर नाईक (71) यांचे सोमवारी पहाटे मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते गेली बरीच वर्षे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. येथील गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे ते सिनेट मेंबर होते. संमोहन प्रयोगातून अनेक संस्थांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारे परोपकारी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

शिरोडा-खासबागवाडीत 10 मार्च 1949 रोजी जन्मलेले मनोहर सदाशिव नाईक यांचे लहानपणीच पितृछत्र हरपले. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्व प्राथमिक शाळा नं. 1 मध्ये पूर्ण केल्यानंतर तत्कालीन अकरावीपर्यंतचे शिक्षण टय़ुटोरिअल हायस्कूल (आजचे अ. वि. बावडेकर विद्यालय) मध्ये झाल्यावर मनोहर नाईक यांनी मुंबई गाठली. कठोर परिश्रम करण्याच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी करीत बी. ए., एम. ए. पदवी संपादन केली.

नाईक यांना लहानपणापासूनच जादूचे प्रयोग करण्याची आवड होती. मुंबईत गेल्यावर त्यांनी संमोहन शास्त्राकडे मोर्चा वळविला. संमोहन विशारद पदवी (हिप्नॉटिझम) त्यांनी संपादन केली. स्टेजवरील 70 ते 80 रसिकांना झोपवून ठेवणे, त्यांच्याकडून विविध कृती करून करुन घेणे, यात त्यांचा हातखंडा होता. हिप्नॉटिझममध्ये तब्बल 50 वर्षांचा अनुभव, मानसशास्त्र, योग, अध्यात्म, नाटक आदी क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास होता. केवळ चार दिवसात प्रॅक्टिकलसह संमोहन शास्त्राचे शिक्षण देणारी 47 पुस्तके त्यांनी लिहून प्रकाशित केली. त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. हिप्नॉटिझमवर त्यांच्या ऑडिओ, व्हीडिओ कॅसेटही निघाल्या. असे चतुरस्र व्यक्तिमत्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचे शिष्य पोलीस, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

Related Stories

शुभांगी साळगावकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

दापोलीतील वनपाल व अन्य एक इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात

Archana Banage

चिपळुणात देशी-विदेशी दारुसाठा जप्त

Patil_p

आजही बरसणार मेघगर्जनसह जलधारा

Patil_p

रत्नागिरीच्या नौकेवर ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’

NIKHIL_N

शिरगाव स्वरुपानंद नगरात विहिरी बनल्या सांडपाण्याने दुषित

Patil_p