Tarun Bharat

संयुक्त राष्ट्रसंघाने आता हिंदूफोबियाचा विरोध करावा

शीख, बौद्धधर्मीयांविरोधातील हिंसा बंद व्हावी

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघात भारताने कट्टरतेवर बुधवारी भूमिका मांडली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदूफोबियाच्या विरोधात स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. शीख आणि बौद्ध धर्मावर कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांचा भारत निषेध करतो. कट्टरता जगासाठी धोकादायक असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी केले आहे.

आशिष हे संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय मोहिमेचे प्रथम सचिव आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे व्यासपीठ आतापर्यंत बौद्ध, हिंदू आणि शीख धर्माच्या लोकांच्या विरोधातील द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रकरणांवर भूमिका स्पष्ट करण्यास अपयशी ठरले आहे. इस्लामोफोबिया आणि ख्रिश्चनविरोधी प्रकरणांमध्येही कारवाई व्हावी. भारतही अशा घटनांची निंदा करत असल्याचे आशिष यांनी म्हटले आहे.

निवडक घटनांवरच चर्चा का?

केवळ ज्यू, ख्रिश्चन किंवा इस्लामशी संबंधित प्रकरणांवरच चर्चा का होते? बामयानमध्ये भगवान बुद्ध यांचा पुतळा तोडण्यात आला हे आम्ही का विसरतो? अफगाणिस्तानात गुरुद्वारावर हल्ला झाला आणि 25 शीख भाविकांचा मृत्यू झाला. काही देशांमध्ये हिंदू आणि बौद्धांची मंदिरे पाडण्यात आली, अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. याप्रकरणांची निंदा  केली जावी आणि यावर चर्चा व्हावी. संयुक्त राष्ट्रसंघात कुठल्याही विशिष्ट धर्मावरच चर्चा होऊ नये तसेच एका धर्माची बाजू उचलून धरली जाऊ नये असे त्यांनी सांगितले आहे.

युरोपीय देशांचा मसुदा

संयुक्त राष्ट्रसंघात 33 युरोपीय देशांनी एक मसुदा सादर केला आहे. हे सर्व देश प्रामुख्याने ख्रिश्चन धर्म मानणारे आहेत.

Related Stories

इराणकडून भारताला झटका; स्वतःच उभारणार चाबहार ते जाहेदानपर्यंतचा रेल्वे मार्ग

datta jadhav

इस्रायलमध्ये योगदिन उत्साहात साजरा

Amit Kulkarni

‘पंजशीर’ काबीज केल्याचा तालिबानचा दावा

Patil_p

अमेरिकेचे एन-35 विमान दुर्घटनाग्रस्त; 7 जवान जखमी

datta jadhav

मंगळ ग्रहासारख्या ठिकाणी वास्तव्याची संधी

Patil_p

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

Archana Banage