Tarun Bharat

संयुक्त राष्ट्रांचे 28 सदस्य देश युक्रेनच्या मदतीला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग तिसऱ्या दिवशी तीव्र झाली आहे. व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली असून, संयुक्त राष्ट्रांच्या 28 सदस्य देशांनी युक्रेनला युद्धविषयक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला तात्काळ लष्करी मदत पोहोचवण्याची तयारी सुरू असून, पहिल्या टप्प्यात नेदरलँडने 200 अँटि एअरक्राफ्ट मिसाईल युक्रेनला रवाना केले आहेत.

युक्रेनची राजधानी कीव्हला रशियन सैन्याने वेढा दिल्यानंतर नेदरलँडने युक्रेनला 200 अँटि-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे पाठवली आहेत. अमेरिकेनेही युक्रेनला तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांना युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी तात्काळ 350 दशलक्ष डॉलर देण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना फोन केला. यावेळी त्यांनी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. युक्रेन या आमच्या मित्र राष्ट्राला शस्त्रास्त्रे आणि लष्करी मदत पाठवली जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. या युद्धामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांमुळे दूरगामी परिणाम होतील’, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये हॉटेलचे 50 टक्के बिल सरकार भरणार

datta jadhav

आकाशात दोन विमानांची जोरदार धडक, पायलटसह 6 ठार

datta jadhav

युरोपमध्ये 30 हजारांपेक्षा अधिक बळी

Patil_p

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख 3 वर्षांनी अमेरिकेच्या दौऱयावर

Patil_p

घोस्ट चाइल्ड’ ठरली ब्रिटनमधील लाखो मुले

Patil_p

अफगाणिस्तानात जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p