Tarun Bharat

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आज दुपारी स्वीडिश अ‍ॅकॅडमीने या पुरस्काराची घोषणा केली. 

भूकबळी संपवण्यासाठी जागतिक अन्न मोहीम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही संस्था जगाच्या पाठीवर कुठेही गरजूंपर्यंत अन्न पुरवठा करते. विशेषतः नैसर्गिक आपत्तींवेळी ही मोहीम राबवली जाते. जागतिक अन्न मोहीम निश्चित लोकसंख्येपर्यंत अन्न-आधारित सामाजिक सुरक्षा कवच सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

या शांततेच्या पुरस्कारासाठी कोरोनाविरोधात लढणारी जागतिक आरोग्य संघटना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्याही नावाची चर्चा होती. 

Related Stories

काँग्रेस आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतलेत; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप

Archana Banage

दहावी परीक्षेचा निकाल 99.9 टक्के

Patil_p

हिजाब प्रकरण : उत्तर प्रदेशातही पडसाद

Patil_p

अरुणाचल प्रदेशात एविएशन ब्रिगेड तैनात

datta jadhav

पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याचा मोदींना सलाम

Patil_p

आशेचा किरण ग्लासगो परिषद

Patil_p
error: Content is protected !!