Tarun Bharat

संयोगिताराजेंनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

ओबेरॉय हॉटेलपासून मंदिरापर्यंत चालत जात श्रींना घातले दंडवत

   मुंबई प्रतिनिधी

खासदार संभाजीराजे यांचे बेमुदत उपोषण सुटल्यानंतर त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी बुधवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतले. ओबेरॉय हॉटेलपासून मंदिरापर्यत चालत जावून त्यांनी सिद्धीविनायकापुढे माथा टेकला. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 26 फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी संयोगिताराजे यांनीदेखील अन्नाच्या कणाला स्पर्श केला नव्हता. राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. अखेर राज्य सरकार नमले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत असल्याचे राज्य सरकारने लेखी दिल्यानंतर संभाजीराजे यांनी सोमवार 28 फेब्रुवारी रोजी उपोषण सोडले. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली होती. पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. या काळात त्यांना साथ देणाऱया संयोगिताराजे यादेखील समस्त मराठा समाज बांधवांप्रमाणे चिंतेत होत्या. पण संभाजीराजे यांचे उपोषण सुटल्यानंतर सर्वांनी निःश्वास सोडला. त्यानंतर संयोगिताराजे यांनी आधी निश्चित केल्याप्रमाणे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी ओबेरॉय हॉटेलपासून त्या संभाजीराजे आणि कार्यकर्त्यांसमवेत मंदिरात चालत गेल्या. तेथे श्रींचे दर्शन घेतले. यावेळी संभाजीराजे, संयोगिताराजे यांच्यासह कार्यकर्तेही भावूक झाले होते.

Related Stories

कोल्हापूर विभागाचा ९९.९२ टक्के निकाल

Archana Banage

गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

datta jadhav

पानसरे हत्या प्रकरण : संशयित आरोपीच्या जामीन अर्जावर २४ ऑगस्टला सुनावणी

Archana Banage

पँगाँग भागात चीन उभारतोय पूल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या 522

Archana Banage

कोल्हापूर : ‘इंडियन हेअर कटिंग सलून’चे मालक प्रकाश माने यांचे निधन

Archana Banage