Tarun Bharat

संरक्षणमंत्र्यांच्या घरावर कारबॉम्बने हल्ला

Advertisements

अफगाणिस्तानात तालिबानचा मोठा हल्ला – विदेश मंत्र्यांकडून भारताला हस्तक्षेपाचे आवाहन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री जनरल बिस्मिल्लाह मोहम्मदी यांच्या निवासस्थानानजीक मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) कारबॉम्बने हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर गोळीबार आणि ग्रेनेडच्या स्फोटाचे आवाजही ऐकू आले आहेत. हा हल्ला काबूलच्या डिस्ट्रिक्ट 10 च्या शिरपूर भागात झाला आहे. संरक्षणमंत्री आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तर अफगाणिस्तानच्या अनेक शहरांमधील लोक तालिबानच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अफगाणिस्तानचे विदेशमंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी तालिबानी हिंसा रोखण्यासाठी भारताला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

काबूलमधील डिस्ट्रिक्ट 10 हा भाग अत्यंत सुरक्षित मानला जातो. तेथे काही खासदार आणि उच्चाधिकाऱयांचीही घरे आहेत अशी माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते मीर वाइस स्टेनकजई यांनी दिली आहे. हल्ल्यानंतर त्वरित सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले होते. स्फोटावेळी संरक्षणमंत्री घरी नव्हते. हा हल्ला संरक्षणमंत्र्यांच्या एका अतिथीगृहात झाला असून कुटुंबातील कुठलाच सदस्य जखमी झालेला नाही. पण अन्य 10 जण जखमी झाले आहेत असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

स्फोटांनंतर जलालाबादमध्ये मोठय़ा संख्येत लोक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी अफगाण सुरक्षा दलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे. तर काबूलमधील नागरिकही तालिबानच्या विरोधात एकवटले आहेत.

भारताला आवाहन

अफगाणिस्तानचे विदेशमंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा करत हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक आयोजित केली जावी. तालिबानचा हिंसाचार आणि अत्याचारांमुळे निर्माण होणारे संकट रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठी भूमिका बजवावी असे अतमार यांनी म्हटले आहे.

सुरक्षा परिषदेकडून निंदा

30 जुलै रोजी हेरातमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिसरात झालेल्या हल्ल्याची सुरक्षा परिषदेने निंदा केली आहे. या हल्ल्यात अफगाण सुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता तसेच अनेक जण जखमी झाले होते. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी तालिबानी हिंसा आणि सर्वसामान्य नागरिकांवरील हल्ल्यांची कठोर निंदा करत अफगाणिस्तानला मदत करणे सुरू ठेवण्यावर भर दिला आहे.

भीषण लढाई सुरूच

अफगाणिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सैन्य आणि तालिबान यांच्यात लढाई सुरू आहे. अफगाण सैन्य लष्करगाहमध्ये तालिबानशी लढत आहे. दक्षिण हेलमंड प्रांत आणि प्रंटलाइन डिस्ट्रिक्टमध्येही भीषण संघर्ष सुरूच आहे. लष्करगाहमध्ये झालेल्या युद्धात मागील 24 तासांमध्ये 40 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तालिबानने देशाचा पूर्वोत्तर प्रांत तखरसह अनेक जिल्हय़ांवर कब्जा केला आहे. तालिबानचे आता देशातील 223 जिल्हय़ांवर नियंत्रण आहे. तर 68 जिल्हय़ांवर सरकारचे नियंत्रण आहे.

Related Stories

भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश

datta jadhav

तृणमूल काँग्रेसकडून अनुसूचित जातींचा अपमान

Patil_p

सिंगापूरच्या पर्यटकाकडून रशियन महिलेवर बलात्कार

Patil_p

व्हिएतनाममध्ये सापडले 1100 वर्षे जुने शिवलिंग

Patil_p

ग्राहकांना किंचित दिलासा : पेट्रोल – डिझेलची किंमती ‘जैसे थे’

Tousif Mujawar

पंजाब काँग्रेसला कॅप्टनचा झटका

Patil_p
error: Content is protected !!