Tarun Bharat

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

संरक्षण विभागासाठीच्या निधीत केवळ 6 टक्के वाढ करण्यात आली आहे. 3.18 लाख कोटींवरून हा निधी यंदा 3.37 लाख कोटी करण्यात आला आहे. देशासमोर संरक्षणविषयक अनेक आव्हाने असताना संरक्षण निधीत करण्यात आलेल्या किरकोळ वाढीमुळे या क्षेत्राच्या पदरी निराशाच आली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव व चीन-बांगलादेश आदी शेजारील देशांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि काश्मीर सारख्या राज्यांमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण निधीत भरघोस वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतीत अर्थमंत्र्यांनी घोर निराशाच केली आहे.

संरक्षण क्षेत्रासाठीच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत केवळ 6 टक्के वाढीव तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी संरक्षण विभागासाठी 3.18 लाख कोटींची तरतूद होती. यावर्षी पेन्शनवरील खर्चासह अन्य खर्चाचा विचार करून ही तरतूद 4.7 लाख कोटी करण्यात आली आहे. यामध्येच पेन्शनसाठीचे 1.33 लाख कोटीचा समावेश आहे. संरक्षण दलासाठीची शस्त्रखरेदी व आधुनिकिकरण यासाठी 1 लाख 13 हजार कोटीची या निधीत समावेश आहे.

Related Stories

एमएसपी अंतर्गत धान्य खरेदीवर भर

Patil_p

क्वारेंटाईन सेंटरमध्ये बिअरची मागणी

Patil_p

उत्तर प्रदेश सहाय्यक अध्यापक भरती परीक्षेत 1 लाख 46 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण 

Tousif Mujawar

सूर्य नमस्काराला मुस्लीम लॉड बोर्डाचा विरोध

Patil_p

सुशीलकुमार मोदी राज्यसभेवर बिनविरोध

Patil_p

महिलांच्या योजनांना बळ

Patil_p