Tarun Bharat

संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांचे मोदींनी केले उद्घाटन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका एव्हेन्यू येथे असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या दोन नवीन कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, संरक्षण खात्याचे प्रधान अध्यक्ष जनरल विपिन रावत (सीडीएस) आणि सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.

संरक्षण मंत्रालयाच्या दोन्ही कार्यालयीन इमारती सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बांधल्या गेल्या आहेत. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाचे मुख्य कार्यालय साऊथ ब्लॉकजवळ होते, तर उर्वरित कार्यालये आसपास होती. परंतु ती आता या दोन इमारतींमध्ये शिफ्ट होतील. तसेच पुढील काही महिन्यांत कर्मचारीही तिकडे वळतील.

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, जुन्या इमारती मोडकळीस आल्या होत्या. अधिकाऱयांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या जागेचा योग्य वापर होत नव्हता, म्हणूनच नवीन इमारतींमध्ये ही कार्यालये शिफ्ट होतील. नवीन कार्यालयांमध्ये 7,000 हून अधिक कामगारांना सामावून घेता येईल. ही संकुले एकविसाव्या शतकाच्या गरजेनुसार बांधली गेली आहेत आणि त्यात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.

Related Stories

एअर एशियन विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Patil_p

1 एप्रिलपासून धावू लागणार सर्व रेल्वेगाडय़ा

Patil_p

व्हिएतनाममध्ये सापडले 1100 वर्षे जुने शिवलिंग

Patil_p

सीएए विरोधी आंदोलन पुन्हा उभे राहणार?

Patil_p

आणखी चार कंपन्या लसउत्पादन करणार

Patil_p

बिहार : राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध

datta jadhav