Tarun Bharat

संशोधनात महिलांचे पुढचे पाऊल

जागतिक क्रमवारीत महिलांनी कोरले सुवर्णाक्षरांनी आपले नाव, पुरूषांचे तुलनेत कमी असल्याचा तज्ञांचा दावा

Advertisements

अहिल्या परकाळे/कोल्हापूर

उच्च शिक्षणातील बहुविद्य शाखांमध्ये शिक्षण घेत करिअर करणाऱया महिलांचे प्रमाण गेल्या पाच दशकांच्या तुलनेत वाढले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवसाय अथवा इतर शाखांमध्ये महिलांचे प्रमाण पुरूषांच्याबरोबरीने वाढताना दिसते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचा विचार करता शिक्षण व गुणवत्ता असूनही घर संसार व इतर जबाबदाऱ्यांमुळे पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी असल्याचे तज्ञांच्या अभ्यासाअंती पुढे येत आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला संशोधकांचा तरूण भारतने घेतलेला आढावा.
दहावी, बारावी ते पदव्युत्तर शिक्षणात महिला अव्वल आहेत. शिवाजी विद्यापीठात अलीकडे संशोधकांची संख्या वाढत आहे. जागतिक संशोधनाच्या क्रमवारीत टॉप टू पर्सेंटेजमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या तब्बल 48 संशोधकांनी सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे. यामध्ये जीव रसायनशास्त्र व जैव तंत्रज्ञान अधिविभागाच्या डॉ. ज्योती जाधव यांचा समावेश आहे. ‘कंपवात आणि स्मृतीभ्रंश’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. विद्यापीठातील 38 अधिविभागात प्राध्यापकांपासून ते अधिविभागप्रमुख, अधिष्ठाता पदापर्यंत महिलांनी मजल मारली आहे. अलीकडे विज्ञानात पीएच. डी. करणाऱ्या महिलांचा टक्काही वाढत आहे. पुढे जावून संशोधनातही अनेक महिलांनी आपले खाते खोलले आहे. परंतू पुरूषांच्या तुलनेत हा टक्का कमी असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. कारण लग्नानंतर संसार आणि करिअरची जबाबदारी एकाचवेळी सांभाळत तारेवरची करसरत करीत संशोधन करावे लागते. परंतू पुढील संशोधनासाठी इतर विद्यापीठात किंवा परदेशात जावून दीर्घ काळ तेथे राहून एकाग्रतेने संशोधन करण्यास महिलांना मर्यादा येत आहेत. परिणामी गुणवत्ता असूनही महिलांचा टक्क शिवाजी विद्यापीठ नव्हे तर भारतासह जागतिक पातळीवरही कमी असल्याचे तज्ञांनी म्हंटले आहे.

शिवाजी विद्यापीठात गेल्या पाच दशकापासून शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या पुरूषांच्या तुलनेत जास्त आहे. गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रपती सुवर्णपदक व कुलपती सुवर्णपदाकाचा बहुमानही महिलाच मिळवत आहेत. उच्च शिक्षणानंतर अध्यापन, उद्योग व्यवसाय, डॉक्टर, अभियांत्रिकी, संगणक प्रोग्रामिंग-डिझायनिंग, बँकिंग, राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आदी क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीन महिला कार्यरत आहेत. शिक्षणातील विविध आव्हाने सक्षपणे पेलत पीएच. डी., संशोधन प्रकल्पही स्वतंत्रपणे करण्यात महिला अव्वल आहेत. त्यानंतर मिळणाऱ्या फेलोशिपसाठी महिला पात्र असतात. परंतू संसार, करिअर सांभाळत फेलोशिप घेवून परदेशात जावून संशोधक करण्यास त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळेच शिवाजी विद्यापीठच नव्हे तर भारतासह जगभरात महिला संशोधकांचा टक्का पुरूषांच्या तुलनेत कमी आहे. महिलांना कुटुंब व समाजाने संशोधनासाठी प्रोत्साहन देणे, याच खऱ्या अर्थाने महिला दिनाच्या शुभेच्छा ठरतील, असा सूर महिला संशोधकांचा आहे.

संशोधनासाठी मिळणाऱ्या फेलोशिप

सिंगल गर्ल्स चाईल्ड फेलोशिप
डी. एस. टी. एन्स्पायर
सारथी फेलोशिप
टाटा इनोव्हेशन फेलोशिप
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहान योजना
लेडी टाटा मेमोरियल रिसर्च फेलोशिप
राजव गांधी नॅशनल फेलोशिप
पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
मेरी क्युरी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
डीएसटी यंग व्युमन सान्टीस्ट फेलोशिप
डॉ. डी. एस. कोठारी पोस्ट डॉक्टरल फिलोशिप

महिलांनी करिअरबरोबर संशोधन करावे
मुलींनी करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल राखून विविध फेलोशिपच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. काही तास नोकरी करण्यात समाधान मानण्यापेक्षा उद्भवणाऱया परिस्थितीवर मात करून, मिळालेल्या ज्ञानाचा वापर विज्ञान संशोधन क्षेत्रात करावा. नोकरीबरोबरच संशोधनाकडे महिलांनी लक्ष दिले तर संशोधन क्षेत्राचा ताबाही महिलाच घेतील.
डॉ. ज्योती जाधव (अधिविभागप्रमुख, जीव रसायनशास्त्र व जैव तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)

अधिविभागवार पीएच. डी. संशोधक महिला
जीव व जैव रसायनशास्त्र : 10
सूक्ष्मजीवशास्त्र : 5
रसायनशास्त्र : 16
भौतिशास्त्र : 20
वनस्पतीशास्त्र : 35
प्राणीशास्त्र : 13
पर्यावरणशास्त्र : 6

Related Stories

दैव बलवत्तर म्हणूनच ट्रॅक्टर थांबला अन्यथा …

Sumit Tambekar

विद्यापीठात हंगामी पदांसाठी आजपासून मुलाखती

Sumit Tambekar

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीची सहा मते फुटली, शिवसेनेला कात्रजचा घाट, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तब्बल पाच दिवसानंतर करवीर तालुक्यातील गावांमध्ये लाईट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!