Tarun Bharat

संशोधनामध्ये गुणवत्ता राखण्याची आवश्यकता

उपकुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा यांचे प्रतिपादन : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे राष्ट्रीय कार्यशाळा

प्रतिनिधी / बेळगाव

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे गुरुवारी एक दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा यांच्या हस्ते करण्यात आले. इंग्रजी विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. नागरत्ना परांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा म्हणाले, विद्यार्थ्यांचे संशोधन कौशल्य वाढविण्यासाठी कार्यशाळा महत्त्वाची आहे. संशोधनामध्ये गुणवत्ता राखण्याची आवश्यकता आहे.

प्रारंभी इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ. मधुश्री कळ्ळीमनी यांनी स्वागत केले. सदानंद ढवळेश्वर यांनी प्रार्थनागीत गायिले. त्यानंतर प्रा. पूजा हल्याळ व प्रा. कविता कुसुगल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रा. तृप्ती करेकट्टी यांनी ‘रिसर्च डिझाईन’ या विषयावर मार्गदर्शन केले. रिसर्च डिझाईनचे नियम आणि टप्प्यांबद्दल सविस्तर माहिती देत शिबिरार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे दिली. दुपारच्या सत्रात कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे प्रा. अशोक हुलीबंडी यांनी संशोधन दाखलीकरणाबाबत माहिती देत दाखलीकरणाचे महत्त्व आणि आवश्यक मुद्दय़ांवर मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिरार्थी महादेव मोकाशी, सिद्धेश्वर कमती, राजशेखर मुलीमनी, समृद्धी बारवी आणि विनायक नंदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील मुचंडी, इमाम कोरबू, दीपिका सुळेभावी, सोमप्पा रामगिरी, किरण नडकट्टी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सदानंद कुरी यांनी केले. आभार प्रा. फय्याज इलकल यांनी मानले.

Related Stories

तलाठय़ाला पाठीशी घालणाऱया तहसीलदारांना न्यायालयाचा दणका

Amit Kulkarni

आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून कारागृहांमध्ये कडक तपासणी

Amit Kulkarni

वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी

Patil_p

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज बेळगावात

Patil_p

प्राचार्य फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

Amit Kulkarni

सौंदत्ती यात्रेत दोन ट्रॉलींचे ट्रक्टर आणण्यास बंदी

Patil_p