Tarun Bharat

संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून होणार सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होणार आहे. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. यंदा अधिवेशनाचे कामकाज १९ जुलै २०२१ रोजी सुरु होऊन १३ ऑगस्टपर्यंत २०२१ पर्यंत चालणार आहे. ते एकूण १९ दिवस चालेल, संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने ही १९ जुलै ते १३ ऑगस्ट या दरम्यान संसदेचे अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती.

यंदाच्या अधिवेशनात देशभरात कोरोना लसीकरण, कृषी विधेयक, देशात वाढती महागाई, सातत्याने होणारी इंधन दरवाढ या मुद्यांवरुन विरोधक सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याची शक्यता आहे. असे अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे मुद्दे या अधिवेशनात चर्चेला घेतले जाणार असल्याने सामान्यांचे ही या अधिवेशनाकडे लक्ष असणार आहे. तसेच या पावसाळी अधिवेशनात कोरोना प्रतिबंधाशी निगडीत सर्व नियमावलीचे पालन केले जाणार आहे.

Related Stories

Teachers Day Special: पंतप्रधानांची मोठी घोषणा; १४ हजार ५०० शाळा अपग्रेड होणार

Archana Banage

कोरोना : दिल्लीत 677 नवे रुग्ण ; 21 मृत्यू

Tousif Mujawar

प्रियंका वड्रांच्या निकटवर्तीयाचा काँग्रेस पक्षाला रामराम

Amit Kulkarni

अखेरच्या टप्प्यात 55 टक्क्यांवर मतदान

Patil_p

भारत-चीन संघर्षावर चर्चा नाकारली; सोनिया गांधींचा सभात्याग

Abhijeet Khandekar

3 ते 4 टप्प्यांमध्ये बिहारची निवडणूक शक्य

Patil_p