Tarun Bharat

संसद बरखास्त केल्यामुळे नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस

Advertisements

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

संसद बरखास्त करण्याच्या निर्णयावरून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रविवारी राष्ट्रपती विद्या भंडारी यांनी पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्या शिफारशीवर संसद बरखास्त करून मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती.

पंतप्रधान ओली यांनी संसदीय मंडळ, केंद्रीय समिती आणि पक्ष सचिवालय येथे बहुमत गमावले आहे. त्यांनी यावर उपाय शोधण्याऐवजी 20 डिसेंबरला तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय घेतला. राष्ट्रपतींनीही संसद बरखास्त करण्याची शिफारस मान्य केली. दरम्यान, अशा प्रकारे संसद बरखास्त करण्याची घटनेत तरतूद नाही. त्यामुळे न्यायालयाने नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली रशिया विरोधात भूमिका

Abhijeet Shinde

चिनी कर्जामुळे मेंटेनेग्रो दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर

Patil_p

खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात

Abhijeet Khandekar

नव्या व्हेरियंट विरोधात मास्कच उपयुक्त

Patil_p

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात कोरोनाचे 2494 बळी

prashant_c

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

datta jadhav
error: Content is protected !!