Tarun Bharat

संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी जागरूकता महत्त्वाची-पिल्लई

प्रतिनिधी /पणजी

गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी एचआयव्ही प्रतिबंधासाठी सुचविलेल्या महत्त्वाच्या सूचना म्हणजे लोकांमध्ये प्रतिज्ञा घेण्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अंमलबजावणीसाठी गोव्यात तळागाळात काम केले जाते हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असे सांगितले. उपचाराव्यतिरिक्त तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

जागतिक एड्स दिनानिमित्त राजभवन येथे आयोजित “गोव्यातील युवकांची एड्स जनजागृती प्रतिज्ञा ” कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स, एज्युकेशन  संगणक आणि व्यवस्थापन  यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . राज्यपालांच्या हस्ते प्रतिज्ञा देण्यात आली.

 विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने लोकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून श्री पिल्लई यांनी गोव्यातील तरुणांना एचआयव्ही आणि एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येण्याची विनंती केली.

 ते म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेने प्लेग, क्षयरोग यांसारख्या सांसर्गिक रोगांचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याची सूचना केली आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीला आपण एड्स, कोविड-19 आणि इतर व्हायरसचा एक आव्हान म्हणून सामना करत आहोत. अशा आव्हानांसाठी आधुनिक वैद्यक प्रणाली अंतर्गत कोणताही निर्दोष उपाय नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत अशा आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

  मिझोरामचे राज्यपाल म्हणून काम करतानाच्या दिवसांची आठवण करून देताना श्री पिल्लई यांनी मिझोराममध्ये काम करताना माझ्या अभ्यासात मला जाणवले की एचआयव्ही किंवा एड्स पसरण्यामागे लैंगिक संबंध हे एकमेव मुख्य कारण नसून विविध औषधे आणि इतर गोष्टींचा वापर हे असू शकते असे सांगितले. मिझोराम म्यानमार (बर्मा) च्या जवळ असल्याने, लोकांना म्यानमार (बर्मा) मध्ये विनामूल्य प्रवेश आहे. लोक कोणत्याही पासपोर्टशिवाय दोन्ही बाजूने सहज प्रवास करू शकतात आणि म्हणूनच ड्रग पॅडलिंग वाढले आहे आणि मिझोरामच्या काही भागांमध्ये एचआयव्हीच्या वाढत्या दरामागील हे मुख्य कारण आहे.

  यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी. मेनन, गोवा विद्यापीठाचे निबंधक वरि÷ प्रा. व्ही. एस. नाडकर्णी, राज्यपालांचे सचिव श्री. आर. मिहीर वर्धन, आयएएस (निवृत्त), राज्यपालांचे संयक्त सचिव श्री गौरीश जे शंखवाळकर, राज्यपालांचे एडीसी श्री विश्राम बोरकर आणि लेफ्टनंट दर्शन एन. शंकराद्दी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. प्रसाद लोलयेंकर, गोवा राज्य एड्स कंट्रोल सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ.गीता काकोडकर, विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.भूषण भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

  विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि गोव्यातील एनएसएस आणि रेड रिबन क्लब असलेल्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेतील औपचारिक कार्यक्रमाला औपचारिकरीत्या उपस्थित राहून एड्स जनजागृतीची शपथ घेतली. तसेच 40 एचआयव्ही मुलांनी ह्य?मन टच फाऊंडेशनच्या समन्वयाने राजभवनाला भेट दिली. राज्यपालांनी प्रति÷ानच्या मुलांशी आणि कर्मचाऱयांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत जेवणही केले.

Related Stories

वेळूस रवळनाथ देवस्थान परिसरात शुकशुकाट

Patil_p

…तर पालकांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षे कारावास!

Patil_p

सत्तरीला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा

Omkar B

ग्रामीण शिक्षक ते…ग्लोबल शिक्षकपर्यत मजल मारणारा डॉ. अशोक प्रियोळकर

Amit Kulkarni

विश्वासार्हता म्हणजे ‘लोकमान्य’ सोसायटी

Patil_p

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B